टेनिस स्पर्धेत गिरीश चौगुले, रोहन फुले, कामया परब, आर्या पाटील यांची आगेकूच
पुणे- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नवव्या ओम दळवी मेमोरियल स्काय डेव्हलपर्स् करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात गिरीश चौगुले, रोहन फुले यांनी, तर मुलींच्या गटात कामया परब, आर्या पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीत रोहन फुलेने साहिल धनवानीचा 9-5 असा तर, अथर्व राणेने अक्षत झुणझुणवालाचा 9-6 असा पराभव करून आगेकूच केली. गिरीश चौगुलेने रिषभ गुंडेचावर टायब्रेकमध्ये 9-8(3) असा विजय मिळवला.
मुलींच्या गटात आर्या पाटील हिने स्नेहा रानडेला 9-7 असे नमविले. कामया परबने अनिशा शेवाळेला 9-6 असे पराभूत केले. सायली जाधवने भाविका गुंडेचाचा 9-0असा सहज पराभव केला.
स्पर्धेचा सिवस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी- मुले
रोहन फुले (महाराष्ट्र)वि.वि साहिल धनवानी(महाराष्ट्र) 9-5
सिद्धांत भवनानी(महाराष्ट्र)वि.वि.सत्या सिंग(महाराष्ट्र)9-0;
अथर्व राणे(महाराष्ट्र) वि.वि अक्षत झुणझुणवाला (महाराष्ट्र)9-6
आदित्य जवळे (महाराष्ट्र)वि.वि.पार्थ सुंब्रे (महाराष्ट्र)9-6
गिरीश चौगुले(महाराष्ट्र)वि.वि.रिषभ गुंडेचा(महाराष्ट्र)9-8(3);
मुली- धरणा मुदलीयार(महाराष्ट्र)वि.वि.ते जस्वीनी डी(महाराष्ट्र)9-0
अग्रीमा तिवारी(महाराष्ट्र)वि.वि.अमिषा पटेल(महाराष्ट्र)9-3
सायली जाधव(महाराष्ट्र)वि.वि.भाविका गुंडेचा(महाराष्ट्र)9-0
जोत्स्ना मदाने(महाराष्ट्र)वि.वि सानिका कांबी(महाराष्ट्र)9-5
कामया परब(महाराष्ट्र) वि.वि अनिशा शेवटे(महाराष्ट्र)9-6
आर्या पाटील (महाराष्ट्र)वि.वि स्नेहा रानडे (महाराष्ट्र)9-7.