पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर पूना क्लब संघाविरुद्ध विजय मिळवला तर, दुसऱ्या सामन्यात आशय पालकर(20-5 व 23-5) याने दोन्ही डावात मिळून घेतलेल्या 10 विकेटच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 136धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय लढतीत आज तिसऱ्या दिवशी पूना क्लब संघाचा डाव 6 बाद 271धावापासून खेळ पुढे सुरु झाला. पहिल्या डावात एमसीए संयुक्त जिल्हा संघाचा डाव 97.3षटकात 575धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात पूना क्लब संघ 100.3षटकात 332धावांवर संपुष्टात आला. यात अजिंक्य नाईक 74, संग्राम अतितकर 55, यश नाहर 52, अनिकेत पोरवाल 48, प्रयाग भाटी 37, ओंकार आखाडे 21, धनराज परदेशी 18 यांनी धावा केल्या. एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडून शामशुझमा काझी(79-3), तरणजित सिंग डीलन(68-2), मनोज इंगळे(71-1) यांनी सुरेख गोलंदाजी करत पहिल्या डावात संघाला 242 धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात एमसीए संयुक्त जिल्हा संघाने 42.2षटकात 3बाद 255धावा केल्या. यात यासार शेखने 120चेंडूत नाबाद 118धावा, आतिश वरपेने 89चेंडूत नाबाद 100धावा निखिल कारलेने 19 धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. सामन्याचा मानकरी द्विशतकी खेळी करणारा मूर्तझा ट्रँकवाला ठरला.
नेहरू स्टेडियम मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी आज क्लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या डावापासून सुरुवात झाली. दुसऱ्या डावात काल डेक्कन जिमखाना संघ 73.3 षटकात 271धावा करता आल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला 283धावांची आवश्यकता होती. या आव्हानाचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 31षटकात 147धावावर कोसळला. यामध्ये सुजित उबाळे 49, नौशाद शेख 26, अतुल विटकर 29यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. डेक्कन जिमखाना संघाने आशय पालकरने 23 धावात 5 गडी राखून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धीरज फतंगरेने 16धावात 2गडी, प्रखर अगरवालने 18धावात 1 गडी बाद करून संघाला 136धावांनी विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी आशय पालकर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 97.3षटकात सर्वबाद 575धावा वि.पूना क्लब:100.3 षटकात सर्वबाद 332धावा(अजिंक्य नाईक 74(194,6×4,2×6), संग्राम अतितकर 55(70,5×4,2×6), यश नाहर 52(47,10×4), अनिकेत पोरवाल 48(92,7×4,1×6), प्रयाग भाटी 37, ओंकार आखाडे 21, धनराज परदेशी 18, शामशुझमा काझी 26-79-3, तरणजित सिंग डीलन 25-68-2, मनोज इंगळे 20.3-71-1); पहिल्या डावात एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडे 242 धावांची आघाडी;
एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 42.2षटकात 3बाद 255धावा(यासार शेख नाबाद 118(120), आतिश वरपे नाबाद 100(89), निखिल कारले 19, ओंकार आखाडे 13-77-2, प्रयाग भाटी 10-47-1); सामना अनिर्णित; एमसीए संयुक्त जिल्हा संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी; सामनावीर-मूर्तझा ट्रँकवाला;
नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदान: पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 36.3षटकात सर्वबाद 107धावा वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 44.1षटकात सर्वबाद 95धावा; डेक्कन जिमखाना संघाकडे पहिल्या डावात 12 धावांची आघाडी;
दुसरा डाव: डेक्कन जिमखाना: 73.3 षटकात सर्वबाद 271धावा(हर्ष सांघवी 76(78,9×4,2×6), यश बोरामनी 48(99,8×4), धीरज फतंगरे 31(64,4×4), आत्मन पोरे 26, आशय पालकर 22, यश बांबोळी 19, तुषार श्रीवास्तव 15, निकित धुमाळ 20.3-83-4, वैभव गोसावी 19-54-3, सुजित उबाळे 13-49-1, संकेत चव्हाण 10-38-1) वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 31षटकात सर्वबाद 147धावा(सुजित उबाळे 49, नौशाद शेख 26, अतुल विटकर 29, आशय पालकर 10-23-5, धीरज फतंगरे 5-16-2, प्रखर अगरवाल 2-18-1); सामनावीर-आशय पालकर; डेक्कन जिमखाना 136धावांनी विजयी.