क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 122धावांची आघाडी

Date:

पुणे- पीवायसी हिंदू  जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत दुसऱ्या दिवशी यश क्षीरसागर 43धावा, सुरज शिंदे 35धावा, सुजित उबाळे 28धावा यांनी केलेल्या धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीविरुद्ध पहिल्या डावात 122धावांची आघाडी घेतली आहे.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तीन दिवस चालणाऱ्या या सामन्यात आज क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 1बाद 16धवांवरून पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा पहिला डाव 44.2षटकात 127धावांवर संपुष्टात आला. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 82.2षटकात 249धावा केल्या. यात सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर यश क्षीरसागरने 100 चेंडूत 6चौकारांच्या मदतीने 43धावा, संकेत चव्हाणने 25धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. संकेत व यश यांनी चौथ्या गड्यासाठी 164 चेंडूत 69धावांची भागीदारी केली. त्यानंतर सुरज शिंदे(35 धावा), सुजित उबाळे(28धावा)यांनी सहाव्या गडयासाठी 68चेंडूत 42धावांची भागीदारी करून क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला पाहिल्या डावात 122 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात देखील क्लब ऑफ महाराष्ट्र सुजित उबाळे(32-3), वैभव गोसावी(15-2) यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 12षटकात 5बाद 64धावा असा अडचणीत आला आहे. यात पवन शहा नाबाद 23धावा, रोहित जना नाबाद 9 धावांवर खेळत आहे. व्हेरॉक व क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:

पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.2षटकात सर्वबाद 127धावा(मिझान सय्यद 40(63,4×4,1×6), शुभम तैस्वाल 34(37,5×4), रोहित जना 16(48), पवन शहा 15(19), सुजित उबाळे 17.5-43-6, सय्यद आतिफ जमाल 2.3-9-1, वैभव गोसावी 13-38-1)वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 82.2षटकात सर्वबाद 249धावा(राजवर्धन उंडरे 18, संकेत चव्हाण 25, यश क्षीरसागर 43(100,6×4), सुरज शिंदे 35(72,6×4), सुजित उबाळे 28(39,6×4), सय्यद आतिफ जमाल 26, कार्तिक पिल्ले 20-41-3, मनोज यादव 21-62-2, शुभम तैस्वाल 12-45-2); क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 122धावांची आघाडी;

दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 12षटकात 5बाद 64धावा(पवन शहा नाबाद 23(28,2×4), ओम भोसले 14, रोहित जना नाबाद 9, सुजित उबाळे ६-32-3, वैभव गोसावी 3-15-2).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...