शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सहाव्या मानांकित रामकुमार रामनाथनने १ तास ३७ मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्याच तिसऱ्या मानांकित सुमित नागलचा ६-४,७-६(५) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४-४ अशा बरोबरीत चाललेल्या सामन्यात रामकुमारने ६व्या गेममध्ये सुमितची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेममध्ये सुमितने रामकुमारची सर्व्हिस ब्रेक केली.सुमितने पुन्हा रामकुमारची सर्व्हिस ब्रेक करत ५-४ अशी बढत घेतली. १०व्या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रामकुमारने ब्रेकपॉईंट मिळवत ५-५ अशी बरोबरी साधली. पुढच्या दोन गेममध्ये दोघांनी सर्व्हिस होल्ड करत ६-६ अशी बरोबरी साधत सामना टायब्रेक पर्यंत आणला. टायब्रेकमध्ये सुमितने ३-० अशी आघाडी घेतली. रामनाथनने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात ६-४ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या मॅचपॉईंटमध्ये ६-५ अशी आघाडी घेत सामना जिंकला.
केपीआयटी- एमएसएलटीए चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनची सरशी
पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताचा राष्ट्रीय क्रमांक तीन व स्पर्धेतील सहावा मानांकित खेळाडू रामकुमार रामनाथनने एकेरी गटात भारताच्या राष्ट्रीय क्रमांक दोन व स्पर्धेतील तिसऱ्या मानांकित सुमित नागलचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सहाव्या मानांकित रामकुमार रामनाथनने १ तास ३७ मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्याच तिसऱ्या मानांकित सुमित नागलचा ६-४,७-६(५) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४-४ अशा बरोबरीत चाललेल्या सामन्यात रामकुमारने ६व्या गेममध्ये सुमितची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेममध्ये सुमितने रामकुमारची सर्व्हिस ब्रेक केली.सुमितने पुन्हा रामकुमारची सर्व्हिस ब्रेक करत ५-४ अशी बढत घेतली. १०व्या गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रामकुमारने ब्रेकपॉईंट मिळवत ५-५ अशी बरोबरी साधली. पुढच्या दोन गेममध्ये दोघांनी सर्व्हिस होल्ड करत ६-६ अशी बरोबरी साधत सामना टायब्रेक पर्यंत आणला. टायब्रेकमध्ये सुमितने ३-० अशी आघाडी घेतली. रामनाथनने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात ६-४ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या मॅचपॉईंटमध्ये ६-५ अशी आघाडी घेत सामना जिंकला.
संघर्षपूर्ण झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या पाचव्या मानांकित जे क्लार्क याने २ तास ३५ मिनिट चाललेल्या सामन्यात कॅनडाच्या चौथ्या मानांकित स्टिव्ह डिझ ६-४,३-६,७-६(२) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पेनच्या सातव्या मानांकित रोबेर्टो ओल्मेडो सोबतचा सामना नेदरलॅंडच्या चौदाव्या मानांकित टिम वान रीजथोवेन याने ७-६(७) असा सामना सोडला.
दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अव्व्ल मानांकित रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने फ्रांसच्या ट्युनीशियाच्या केल्विन हेमरी व अझिझ डोगाझ यांचा ६-३,६-४ असा पराभव करत दुहेरीच्याही उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथी मानांकित जोडी भारताच्या विजय सुंदर प्रशांतने इंग्लंडच्या ब्रेडन क्लेनच्या साथीत भारताच्या निकी कोलीयांदा पुनाचा व अनिरूध्द चंद्रसेखर यांचा ६-२,६-३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ऐकेरी गट- उपांत्यपूर्व फेरी
रामकुमार रामनाथन(६)(भारत) वि वि सुमित नागल(३)(भारत) ६-४,७-६(५)
जे क्लार्क(5)(ग्रेट ब्रिटन) वि वि स्टिव्ह डिझ(४)(कॅनडा) ६-४,३-६,७-६(२)
रोबेर्टो ओल्मेडो(७)(स्पेन) वि वि टिम वान रीजथोवेन(14)(नेदरलॅंड) ७-६(७)(सामना सोडला)
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
ब्रेडन क्लेन(इंग्लंड)/विजय सुंदर प्रशांत(भारत)(4) वि वि निकी कोलीयांदा पुनाचा(भारत)/अनिरूध्द चंद्रसेखर(भारत) ६-२,६-३
रामकुमार रामनाथन(भारत)/पुरव राजा(भारत) वि वि केल्विन हेमरी(फ्रांस)/अझिझ डोगाझ(ट्युनीशिया) ६-३,६-४