महाराष्ट्राच्या वैभव श्रीराम, मधुरीमा सावंत यांचा अव्वल मानांकीत खेळाडूंवर विजय

Date:

औरंगाबाद: एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वैभव श्रीराम, अधिरी अवल व  सिद्धार्थ मराठे यांनी तर मुलींच्या गटात  साहिरा सिंग,  परी चव्हाण,  सायना देशपांडे व  अमोदीनी नाईक यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. 

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत वैभव श्रीरामने हरियाणाच्या अव्वल मानांकीत वंश नांदलचा 3-6, 6-1, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने चौथ्या मानांकीत महाराष्ट्रच्या वितीन राठीचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या सिद्धार्थ  मराठेने कर्नाटक नवव्या मानांकीत स्कंद रावचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. 

मुलींच्या गटात उप-उपांत्यपुर्व फेरीत महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत मधुरीमा सावंतने तेलंगणाच्या अव्वल मानांकीत चांदनी श्रीनिवासनचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पंजाबच्या बिगर मानांकीत साहिरा सिंगने दिल्लीच्या तिस-या मानांकीत रिया सचदेवचा 6-2,6-4 असा पराभव करत खळबलजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने तेलंगणाच्या सातव्या मानांकीत सौम्या रोंडेचा 6-4, 6-0 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सायना देशपांडेने उत्तर प्रदेशच्या दहाव्या मानांकीत सौम्रीती वर्माचा 6-3, 6-3 असा तर कर्नाटकच्या अमोदीनी नाईकने दिल्लीच्या पाचव्या मानांकीत समिक्षा दबसचा 6-2,7-6(7) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उप-उपांत्यपुर्व फेरी:

वैभव श्रीराम (महाराष्ट्र)वि.वि.  वंश नांदल(1)(हरियाणा) 3-6, 6-1, 7-5

अधिरी अवल(दिल्ली) वि.वि वितीन राठी(4)(महाराष्ट्र)6-2, 6-2
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. स्कंद राव(9)(कर्नाटक) 6-2, 6-2
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र)  वि.वि  अर्णव कोकणे(महाराष्ट्र) 7-6(6),7-6(6),6-1
काहिर वारीक(महाराष्ट्र)(6)वि.वि. भारत फुलवारीया(दिल्ली) 6-4, 6-4
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) वि.वि.  सार्थ बनसोडे(महाराष्ट्र) 6-3, 6-1
ऋषील खोसला(2)(कर्नाटक)वि.वि.  रुरीक रजनी (तमिळनाडू)6-2, 6-2

मुली: उप-उपांत्यपुर्व फेरी:
मधुरीमा सावंत(महाराष्ट्र)वि.वि चांदनी श्रीनिवासन(1)(तेलंगणा)  6-1, 6-0
साहिरा सिंग(पंजाब) वि.वि रिया सचदेव(3)(दिल्ली) 6-2,6-4
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि सौम्या रोंडे(7)(तेलंगणा)6-4, 6-0
सायना देशपांडे(महाराष्ट्र) वि.वि सौम्रीती वर्मा(10)(उत्तर प्रदेश)6-3, 6-3
अमोदीनी नाईक(12)(कर्नाटक) वि.वि समिक्षा दबस(5)(दिल्ली)6-2,7-6(7)
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि ध्वनी कवद(गुजरात)6-3, 6-3
रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र) वि.वि पुष्टी लध्दा(तेलंगणा) 6-4, 6-2
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा भाग!- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ एचे कोथरुडकरांसमोर सादरीकरण पुढील...

परांजपे रस्त्यावर महिनाभरापासून खड्डा उघडाच, नागरिकांनी वेधले लक्ष 

पुणे: शहरातील गजबजलेल्या फर्गसन रस्ता ते आपटे रस्त्याला जोडणाऱ्या रँग्लर  परांजपे  रस्त्यावर, (हॉटेल...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद...

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला...