सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अर्बन रेवन्स, पेलिकन स्मॅशर्स, द ईगल्स संघांची विजयी सलामी

Date:

पुणे, दि. 5 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत अर्बन रेवन्स, पेलिकन स्मॅशर्स आणि द ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सलामीच्या लढतीत अर्बन रेवन्स संघाने  इम्पेरियल स्वान्स संघाचा 4-3  असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून आनंद शहा, गिरीश मुजुमदार,  श्रीदत्त शानबाग, विवेक जोशी, देवेंद्र राठी, रोहित भालेराव, केदार नाडगोंडे, संग्राम पाटील यांनी अफलातून कामगिरी केली.

दुस-या लढतीत पेलिकन स्मॅशर्स संघाने स्कॅवेंजर्स संघाचा 4-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पेलिकन स्मॅशर्स संघाकडून सचिन जोशी, विवेक लिमये, सचिन अभ्यंकर, नितल शहा, प्रथम वाणी व सिध्दार्थ साठे यांनी सुरेख कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.  तिसऱ्या लढतीत चेतन वोरा, तेजस चितळे, बिपीन चोभे, बिपीन देव, विमल हंसराज, शिवकुमार जावडेकर, आर्य देवधर, देवेंद्र चितळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर द ईगल्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.

स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल व उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, सारंग लागू, अभिषेक ताम्हाणे, रणजित पांडे, गिरीश करंबेळकर, विनायक द्रविड, देवेंद्र चितळे, तुषार नगरकर, अभिजीत खानविलकर आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
अर्बन रेवन्स वि.वि.इम्पेरियल स्वान्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अद्वैत जोशी/अजिंक्य मुठे पराभूत वि.मिहीर केळकर/तेजस किंजिवडेकर 12-21, 17-21; सिल्वर खुला दुहेरी गट : आनंद शहा/गिरीश मुजुमदार वि.वि.प्रिती फडके/विक्रम ओगले 21-15, 21-08; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: अनिकेत शिंदे/सारा नवरे पराभूत वि.अनिश राणे/आदिती रोडे 06-21, 21-19, 16-21;  वाईजमॅन  : श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि.हेमंत पाळंदे/संदीप साठे 21-10, 21-12;  सिल्वर मिश्र दुहेरी गट:अनिकेत सहस्रबुद्धे/प्रांजली नाडगोंडे पराभूत वि.ईशान भाले/केदार देशपांडे 13-15, 15-14, 11-15; सिल्वर खुला दुहेरी गट:देवेंद्र राठी/रोहित भालेराव वि.वि.विनायक भिडे/विश्वेश कट्क्कर 15-10, 15-07; गोल्ड खुला दुहेरी गट: केदार नाडगोंडे/संग्राम पाटील वि.वि. आदित्य काळे/तुषार नगरकर 21-12, 21-19);

पेलिकन स्मॅशर्स वि.वि स्कॅवेंजर्स  4-3( गोल्ड खुला दुहेरी गट:    हर्षद बर्वे/प्रतिक धर्माधिकारी पुढे चाल वि अतुल बिनिवाले/मकरंद चितळे 0-1;सिल्वर खुला दुहेरी गट :   भाग्यश्री देशपांडे/दत्ता देशपांडे पराभूत वि अभिजीत राजवाडे/अनिश रुईकर 06-21, 10-21;  गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट:   हर्षद बर्वे/चैत्राली नवरे पराभूत वि तन्मय चोभे/शताक्षी किनिकर 13-21, 11-21;  वाईजमॅन : सचिन जोशी/विवेक लिमये वि.वि रमन जैन/विरल देसाई21-06, 21-00;   सिल्वर मिश्र दुहेरी गट:   सचिन अभ्यंकर/नितल शहा वि.वि मनिष शहा/अमोल दामले 15-08, 12-15, 15-14; सिल्वर खुला दुहेरी गट:  अंकुश मोघे/मिथाली कुलकर्णी पराभूत वि कविता रानडे/तन्मय चितळे 11-15, 12-15;  गोल्ड खुला दुहेरी गट:    प्रथम वाणी/सिध्दार्थ साठ्ये वि.वि अमित देवधर/मिहिर विंझे 21-20, 16-21, 21-17);


द ईगल्स वि.वि  फाल्कन्स 4-3(
 गोल्ड खुला दुहेरी गट:    चेतन वोरा/ तेजस चितळे वि.वि आनंद घाटे/राजशेखर करमरकर 21-14, 21-15; सिल्वर खुला दुहेरी गट :  बिपीन चोभे/बिपीन देव वि.वि मधुर इंगळालीकर/मंदार विंझे 21-06, 21-13; गोल्ड खुला मिश्र दुहेरी    अनिरूध्द आपटे/गौरी कुलकर्णी पराभूत वि पराग चोपडा/दिप्ती सरदेसाई 12-21, 13-21;  वाईजमॅन  :  अविनाश दोशी/संजय फेरवाणी पराभूत वि अनिल देडगे/निलेश केळकर 14-21, 20-21;    सिल्वर मिश्र दुहेरी गट:      विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर वि.वि निखिल चितळे/रोहन छाजेड 15-02, 15-12;  सिल्वर खुला दुहेरी गट:    अमोल काने/अयुष गुप्ता पराभूत वि अभिषेक ताम्हाणे/राहूल परांजपे 04-15, 10-15;  गोल्ड खुला दुहेरी गट:   आर्य देवधर/देवेंद्र चितळे वि.वि रणजीत पांडे/तन्मय अगाशे 21-16, 20-21, 24-16).   
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माधव भंडारींना पुन्हा डावलले …विधान परिषदेसाठी भाजपचे ३ उमेदवार जाहीर

मुंबई-संघ परिवारातील निष्ठावंत असा लौकिक प्राप्त असलेल्या माधव भंडारींना...

वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे-डॉ. सदानंद मोरे

पुणे –“दर्जेदार वैचारिक लेखन हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत...

औरंगजेब समजून बहादूर शाह जफरांचा फोटो जाळला:पुण्यात ‘पतित पावन संघटने’कडून मोठी गफलत

बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते....

महापालिकेची उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली-उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे

पुणे- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्याने...