पुणे– पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-34 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी फ्लाईंग हॉक्स संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-34 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साली याने नील केळकरचा 4-3 असा पराभव करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. 12वर्षाखालील मुलांच्या गटात तेज ओकने शिवम पाडीयाचा 6-0 असा तर मुलींच्या गाटत अंजली निबाळकरने खुशी पाटीलचा 6-0 असा सहज पराभव करत संघाला आघाडी मिळवून देत संघाचा डाव बळकट केला. 14वर्षाखालील मुलांच्या गटात सुधांशू सावंतने ऋषिकेश बर्वेचा 6-0 असा पराभव केला.
कुमार दुहेरी गटात पार्थ देवरूखकर व साईराज शोत्री या जोडीने प्रणव इंगोळे व रेन मुजगुले यांचा 6-1 असा तर 14 वर्षाखालील दुहेरी गटात तनिष बेलगलकर व श्लोक गांधी यांनी वेदांत ससाने व अथर्व जोशी यांचा 5(3)-6 असा टायब्रेक मध्ये पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फ्लाईंग हॉक्स वि.वि कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स: 40-34(एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: सृष्टी सुर्यवंशी पराभूत वि श्रावी देवरे 3(5)-4; 10 वर्षाखालील मुले: सक्षम भन्साली वि.वि नील केळकर 4-3; 10वर्षाखालील मुली: जसलीन कटरिया पराभूत वि मृणाल शेळके 0-4; 12वर्षाखालील मुले: तेज ओक वि.वि शिवम पाडीया 6-0; 12वर्षाखालील मुली: अंजली निबाळकर वि.वि खुशी पाटील 6-0; 14वर्षाखालील मुले: सुधांशू सावंत वि.वि ऋषिकेश बर्वे 6-0; 14वर्षाखालील मुली: कौशिकी सामंत पराभूत वि रुमा गायकैवारी 1-6; कुमार दुहेरी गट: पार्थ देवरूखकर/साईराज शोत्री वि.वि प्रणव इंगोळे/रेन मुजगुले 6-1 ; 14 वर्षाखालील दुहेरी गट: तनिष बेलगलकर/श्लोक गांधी वि.वि वेदांत ससाने/अथर्व जोशी 5(3)-6 ; 10 वर्षाखालील दुहेरी गट: निव गोईल/देव गुहालेवाला पराभूत वि आर्यन किर्तने/संमिहन देशमुख 1-4 ; मिश्र दुहेरी गट: एंजल भाटिया/चिराग चौधरी पराभूत वि डेलिशा रामघट्टा/आरूष मिश्रा 2-6