- महिला गटात अलिना शहाचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या ऐश्वर्य सिंग व वीर चॊत्रानी, सर्व्हिसेसच्या संदीप जांगरा, रवी दिक्षित या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या ऐश्वर्य सिंग याने सर्व्हिसेसच्या आशिष पटेलचा 11-3, 11-5, 11-7 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. तामिळनाडूच्या गुहान सेंथिलकुमार याने सर्व्हिसेसच्या अवदेश यादवचा 11-2, 11-1, 11-5 असा पराभव करून आगेकूच केली. सर्व्हिसेसच्या संदीप जांगरा याने महाराष्ट्राच्या रौनक सिंगचा 11-3, 11-3, 11-1 असा तर, सर्व्हिसेसच्या रवी दिक्षितने मेहुल कुमारचा 11-4, 11-7, 11-5 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
महिला गटात पहिल्या पात्रता फेरीत भारताची कुमार गटातील क्र. 3खेळाडू अलिना शहा हिने आपलीच राज्य सहकारी निकिता अगरवालचा 13-11 11-8 11-5 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.
स्पर्धेचे उदघाटन आज(दि. 13 जून रोजी) सायंकाळी 4.30वाजता संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर, पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीडीएसएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- चौथी(अंतिम) पात्रता फेरी- पुरूष गट
गुहान सेंथिलकुमार(तामिळनाडू)[9/16] वि.वि.अवदेश यादव(सर्व्हिसेस)[25/40]11-2, 11-1, 11-5;
ऐश्वर्य सिंग(महाराष्ट्र)[9/16]वि.वि.आशिष पटेल(सर्व्हिसेस)[17/24] 11-3, 11-5, 11-7;
वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.दिनेश आर(तामिळनाडू)[17/24] 11-9, 11-6 सामना सोडून दिला;
संदीप जांगरा(सर्व्हिसेस)[9/16]वि.वि. रौनक सिंग(महाराष्ट्र)11-3, 11-3, 11-1;
रवी दिक्षित(सर्व्हिसेस)[41/56] वि.वि.मेहुल कुमार[25/40] 11-4, 11-7, 11-5
महिला गट: पहिली पात्रता फेरी:
अलिना शहा(महाराष्ट्र)वि.वि.निकिता अगरवाल(महाराष्ट्र)13-11 11-8 11-5;
अंजली सेमवाल(महाराष्ट्र)वि.वि.रेशा पाटील(कर्नाटक)11-1, 11-1, 11-3;
सानो सिंघी(पश्चिम बंगाल)वि.वि.एली ताहमसेबमिर्झा(महाराष्ट्र)11-1, 11-1, 11-1;
ऐश्वर्या खुबचंदानी(महाराष्ट्र)[9/16] वि.वि.राधिका जैन(राजस्थान)11-1, 11-3, 11-2;
प्रशस्ती मट्टास(गोवा)वि.वि.श्रुती माने(महाराष्ट्र)11-2, 11-0, 11-2;
आरिया पटेल(महाराष्ट्र)वि.वि.निशिता बुर्हान(जम्मू-काश्मीर)11-0, 11-0, 11-0;
अन्वेषा रेड्डी(तामिळनाडू)वि.वि.अंकिता पाटील(महाराष्ट्र)11-1, 11-2, 11-1;
गांगू निर्गुडा(महाराष्ट्र)वि.वि.सोनी कुमारी(बिहार)11-0, 11-2, 11-0;
होवरा भानापुरवाला(महाराष्ट्र)वि.वि.नेकीता चावला(दिल्ली) 11-3, 11-5, 11-5;
योष्णा सिंग(महाराष्ट्र)वि.वि.मेहर उन निसा(जम्मू-काश्मीर)11-1, 11-1, 11-1;
बिजली दरवडा(महाराष्ट्र)वि.वि.नेहा कुमारी(बिहार)11-0, 11-0, 11-1;