व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद -ओम भोसलेची धडाकेबाज शतकी खेळी;

Date:

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत अॅलन रॉड्रिगेस(47-4 व 37-2) याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह ओम भोसले(नाबाद 100धावा) आणि ऋतुराज गायकवाड(116धावा) यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 121 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या दोन दिवसीय अंतिम सामन्यात पहिल्या डावात व्हेरॉक संघाने पहिल्यांदा खेळताना 40षटकात 8बाद 276धावा केल्या.तत्पूर्वी काल पीवायसी 20षटकात 1बाद 160धावा अशा सुस्थितीत होता. पीवायसी संघाचा आज 20व्या षटकांपासून खेळ सुरु झाला. यात प्रीतम पाटीलने 90 चेंडूत 109धावा, दिव्यांग हिंगणेकरने 75 चेंडूत 59 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद बाद झाल्यानंतर रोहन दामलेच्या 18, यश मानेच्या 18 धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. अॅलन रॉड्रिगेसने 47 धावात 4 गडी, तर राहुल वारेने 47 धावात 2 गडी बाद करून पीवायसीला 242 धावांवर रोखले. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 192(वजा 50धावा)झाली व व्हेरॉक संघाने पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात व्हेरॉक संघाने 20षटकात 3बाद 216 धावा केल्या. व्हेरॉकचे 3गडी बाद झाल्याने त्यांची अंतिम धावसंख्या  201धावा(वजा15धावा) झाली. यात ओम भोसलेने धडाकेबाज खेळी करत 80 चेंडूत  12 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. ओमला सुधांशू गुंडेतीने 38 चेंडूत 40 धावा करून सुरेख साथ दिली. ओम आणि सुधांशू यांनी दुसऱ्या गडयासाठी 70 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ओम भोसले व ऋतुराज गायकवाड(43धावा) यांनी तिसऱ्या गडयासाठी 48 चेंडूत 90 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पीवायसी संघाला विजयासाठी 20 षटकात 246 धावांची गरज होती. यात करण जाधव नाबाद 56, योगेश चव्हाण 31, प्रीतम पाटील 11, मंदार भंडारी 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.व्हेरॉककडून मनोज यादव(33-2), अॅलन रॉड्रिगेस(37-2), राहुल वारे(22-1), विनय पाटील(24-1), ऋतुराज गायकवाड(0-1)यांनी सुरेख गोलंदाजी करून संघाचा विजय सुकर केला.

स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला गोल्डफिल्ड मांडके शिल्ड व 15हजार रुपये, तर उपविजेत्या पीवायसी संघाला 10हजार रुपये व शिल्ड अशी पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोल्फफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, सारंग लागू, रणजित पांडे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 8बाद 236धावा(276-40धावा)(ऋतुराज गायकवाड 116(106,10×4,2×6), ओम भोसले 42(27), उत्कर्ष अगरवाल 36(73), विनय पाटील 25(19), विशाल गीते 21(16), शुभम तैस्वाल 11, प्रदीप दाढे 6-70-4, योगेश चव्हाण 8-47-2, अभिषेक परमार 5-35-1, दिव्यांग हिंगणेकर 7-47-1)वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 38षटकात सर्वबाद 192धावा(242-50धावा)(प्रीतम पाटील 109(90,11×4,6×6), दिव्यांग हिंगणेकर 59(75,3×4,4×6), रोहन दामले 18, यश माने 18, अॅलन रॉड्रिगेस 8-47-4, राहुल वारे 8-47-2, शुभम तैस्वाल 6-55-1); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 44 धावांची आघाडी;

दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 20षटकात 3बाद 201धावा(216-15धावा)(ओम भोसले नाबाद 100(80,12×4,2×6), ऋतुराज गायकवाड 43(25), सुधांशू गुंडेती 40(38), विनय पाटील 23(16), दिव्यांग हिंगणेकर 4-51-1, योगेश चव्हाण 4-18-1) वि.वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 18.1षटकात 9बाद 124धावा(169-45धावा)(करण जाधव नाबाद 56(53), योगेश चव्हाण 31(20), प्रीतम पाटील 11, मंदार भंडारी 20(13), मनोज यादव 2-33-2, अॅलन रॉड्रिगेस 4-37-2, राहुल वारे 4-22-1, विनय पाटील 2-24-1, ऋतुराज गायकवाड 0.1-0-1); सामनावीर-ओम भोसले; व्हेरॉक संघ 121 धावांनी विजयी.

इतर पारितोषिके:
सर्वोकृष्ट फलंदाज: ऋतुराज गायकवाड(447धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: शुभम तैस्वाल(17विकेट)
मालिकावीर: दिव्यांग हिंगणेकर(358धावा व 9 विकेट)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: साहिल छुरी(7 झेल);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: मंदार भंडारी(8 झेल व 1 स्टॅम्पिंग);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...