पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक संघाची केडन्स संघावर मात -व्हेरॉकच्या विनय पाटीलची दमदार शतकी खेळी

Date:

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विनय पाटील(नाबाद 142धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केडन्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवत पहिला विजय नोंदविला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशीचा खेळ व्हेरॉक संघ 13 षटकात 1 बाद 85धावा अशा डावापासून पुढे सुरु झाला. काल केडन्स संघाचा डाव 39.3षटकात 174धावांवर संपुष्टात आला. याच्या उत्तरात व्हेरॉक संघाने 40 षटकात 3बाद 327धावा करून 138 धावांची आघाडी घेतली. 3 गडी बाद झाल्याने व्हेरॉकची अंतिम धावसंख्या 312 झाली. यात विनय पाटीलने धडाकेबाज फलंदाजी करत 155 चेंडूत 12चौकार, 1षटकारांच्या मदतीने नाबाद 142धावा, तर मिझान सय्यदने 84 चेंडूत 59 धावा केल्या. विनय पाटील(142धावा) व मिझान सय्यद(59धावा) यांनी दुसऱ्या गडयासाठी 187 चेंडूत 151धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 24 चेंडूत 49धावा केल्या. केडन्सकडून गणेश गायकवाडने 51 धावात 3 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात केडन्स संघाने 20षटकात 7बाद 195धावा केल्या. पण त्यांचे 7 गडी बाद झाल्याने केडन्सची धावसंख्या 160झाली. यात गणेश गायकवाडने 47 चेंडूत 73धावा, अथर्व धर्माधिकारीने 62 चेंडूत 52 धावा केल्या. व्हेरॉककडून कार्तिक पिल्ले 4-30-2, अॅलन रॉड्रिगेस 3-33-2, विशाल गीते 3-32-2यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेरॉकला निर्धारित षटकात विजयासाठी 23धावांची गरज होती. पण व्हेरॉकने हे आव्हान 8.5षटकात 2बाद 73धावा केल्या. यात सुधांशू गुंडेतीने 33 चेंडूत नाबाद 38धावा, विनय पाटीलने 14धावा व उत्कर्ष अगरवालने नाबाद 17धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला. सामनावीर हा ‘किताब विनय पाटील याला देण्यात आला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: केडन्स: 39.3षटकात सर्वबाद 174(224-50धावा)धावा(निखिल पराडकर 86(88,8×4,1×6), गणेश गायकवाड 54(74,4×4,1×6), इझान सय्यद 21(41), शुभम तैस्वाल 8-41-5, कार्तिक पिल्ले 6-23-2, उत्कर्ष अगरवाल 2-17-1) वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40षटकात 3 बाद 312धावा(327-15धावा)(सुधांशु गुंडेती 48(45,8×4), विनय पाटील नाबाद 142(155,12×4,1×6), मिझान सय्यद 59(84,2×4), ऋतुराज गायकवाड  49(24,2×4,4×6), गणेश गायकवाड 8-51-3); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 138 धावांची आघाडी;

दुसरा डाव: केडन्स: 20षटकात 7बाद 160धावा(195-35धावा)(गणेश गायकवाड 73(47,7×4,3×6), अथर्व धर्माधिकारी 52(62,4×4), कार्तिक पिल्ले 4-30-2, अॅलन रॉड्रिगेस 3-33-2, विशाल गीते 3-32-2)पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 8.5षटकात 2बाद 73धावा(सुधांशू गुंडेती नाबाद 38(33,6×4),उत्कर्ष अगरवाल नाबाद 17, विनय पाटील 14, अक्षय वाईकर 3.5-22-2); सामनावीर-विनय पाटील; व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी 8 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...