पाचगणी, दि.2 ऑक्टोबर 2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात करिम खान, अर्जुन गोहड या बिगर मानांकीत खेळाडूंनी हितेश पी व प्रथम भुजबळ या मानांकीत खेळाडूंचा पराभव करत दुसरी फेरी गाठली. तर मुलींच्या गटात राधिका महाजन व विधि बर्मन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत बिगर मानांकीत करिम खानने आठव्या मानांकीत हितेश पी याचा 6-3,3-6,7-6(2) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला तर बिगर मानांकीत अर्जुन गोहडने सहाव्या मानांकीत प्रथम भुजबळचा 6-4,6-1 असा सहज पराभव केला. अव्वल मानांकीत आदित्य बलसेकरने रुद्र कपूरचा 6-3, 3-6,6-4 असा तर दुस-या मानांकीत निरंजन निखिल थीरू याने अथर्व अमृलेचा 6-0,6-2 असा पराभव करत आगेकुच केली
मुलींच्या गटात राधिका महाजनने तन्मयी तुडयेकर 6-0, 6-0 असा तर विधि बर्मनने हरिणी हरीकृष्णनचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली मुख्य फेरी मुले-
करिम खान वि.वि हितेश पी (8) 6-3,3-6,7-6(2)
अर्जुन गोहड वि.वि प्रथम भुजबळ (6) 6-4,6-1
आर्यन भाटीया(7) वि.वि देव उपेंद्र पटेल 6-3, 6-0
आदित्य बलसेकर(1) वि.वि रुद्र कपूर 6-3, 3-6,6-4
सर्वेश बिरमाने(3) वि.वि संदेश कुरळे 6-7(4),6-1,6-1
अर्जून कुंडू(5) वि.वि सिध्दार्थ जाडली 6-3,6-4
संस्कार चोबे(4) वि.वि वर्धन कारकल 6-1,6-3
निरंजन निखिल थीरू(2) वि.वि अथर्व अमृले 6-0,6-2
मुली
राधिका महाजन वि.वि तन्मयी तुडयेकर 6-0, 6-0
विधि बर्मन वि.वि हरिणी हरीकृष्णन 6-3, 6-2


