कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Date:

पुणे,दि.28 मार्च 2019: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत उपांत्य फेरीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स या संघांनी अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व पांडे डिझाईन्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने एमपी स्ट्रायकर्सचा 2-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत गाठली. सामन्यात पहिल्या लढतीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सच्या लकी वटनानीने सुरेख खेळ करत एमपी स्ट्रायकर्सच्या केतन चावलाचा 42-07, 89(66)-06, 00-56, 68-01 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. लकी याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 66 गुणांचा ब्रेक नोंदविला. दुसऱ्या लढतीत लक्ष्मण रावतने भरत सिसोडियाला 57-00, 88-42, 47-24 असे नमवित संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने पांडे डिझाईन्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शिवम अरोरा याला कडवी झुंज देत पांडे डिझाईन्सच्या दिग्विजय केडियनने 12-42, 50-63, 25-45 असा पराभव करून संघाला 1-0आघाडी प्राप्त करून दिली. दुसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या संदीप गुलाटी याने पांडे डिझाईन्सच्या अनुज उप्पलचा 68-05, 69-42, 05-44, 63-23 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शोएब खान याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमानीचा 31-34, 75-49, 16-43, 70-38, 62-00 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाचा विजय सुकर केला. अंतिम फेरीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघापुढे कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सचे आव्हान असणार आहे.

याआधीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिग्विजय केडियन, ब्रिजेश दमानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन्स संघाने क्यू क्लब वॉरियर्सचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने खार जिमखाना संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-0(लकी वटनानी वि.वि.केतन चावला 42-07, 89(66)-06, 00-56, 68-01; लक्ष्मण रावत वि.वि.भरत सिसोडिया 57-00, 88-42, 47-24);

कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.पांडे डिझाईन्स 2-1(शिवम अरोरा पराभूत वि.दिग्विजय केडियन 12-42, 50-63, 25-45; संदीप गुलाटी वि.वि.अनुज उप्पल 68-05, 69-42, 05-44, 63-23; शोएब खान वि.वि.ब्रिजेश दमानी 31-34, 75-49, 16-43, 70-38, 62-00);

उपांत्यपूर्व फेरी:
पांडे डिझाईन्स वि.वि.क्यू क्लब वॉरियर्स 2-0
(दिग्विजय केडियन वि.वि.आशिक मुदसिर 13-48, 59-58, 58-00, 54-43; ब्रिजेश दमानी वि.वि.शाहबाज खान 37-32, 58(56)-27, 56-16);

कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.खार जिमखाना 2-0(शिवम अरोरा वि.वि.इशप्रित चड्डा 68-00, 67-17, 19-36, 123(103)-01; संदीप गुलाटी वि.वि.रिषभ ठक्कर 60-05, 83-36, 44-08);

कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.केएसबीए 2-0(लक्ष्मण रावत वि.वि.योगेश कुमार 37-03, 78-45, 00-40, 63-48; फैजल खान वि.वि.दक्ष रेड्डी 59-02, 74(50)-41, 41-30);

एमपी स्ट्रायकर्स वि.वि.पंडित जावडेकर असोसिएट्स 2-0(भरत सिसोडिया वि.वि.सिद्धार्थ पारीख 54-26, 71-00, 19-33, 73-43; अनुराग गिरी वि.वि.मोहम्मद हुस्सेन खान 36-11, 74-29, 59(59)-00).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...