रँन्को पोपोविच एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक
पुणे: राजेश वाधवान यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघाने रँन्को पोपोविच यांची आज मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्याची घोषणा केली. मूळ सर्बियाचे असलेले रँन्को पोपोविच हे इंडियन सुपर लीगमधील आपले पदार्पण एफसी पुणे सिटीच्या माध्यमातून २०१७८-१८ या मौसमपासून सुरु करणार आहेत.
पोपोविच यांनी आपल्या व्यवस्थापकीय कारकिर्दीची व्यावसायिक सुरुवात २००१मध्ये टस एफसी आर्नफेल्स या ऑस्ट्रेलियन क्लबपासून केली. त्यांनतर एफसी पॅचर्न या आणखी एका ऑस्ट्रियन क्लब मध्ये त्यांनी २००४ ते २००६ या दरम्यान काम केले. त्यांनतर त्यांनी २००६मध्ये सँफ्रिश हिरोशिमा या संघाची सूत्रे सांभाळल्यानंतर ते एफसी पारटेक सोबोटीका या आपल्या संघाकडे परतले आणि २००९पर्यंत त्यांनी सर्बियन्स सुपर लिगा स्पर्धेत आपली सेवा रुजू केली.
त्यानंतर पोपोविच जपानकडे परतले आणि त्यांनी ओयटा ट्रिनिटा, एफसी माचेडा झेलविया व एफसी टोकिओ या संघांचे व्यवस्थापक पद सांभाळत थेट जपान लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य अशा सेरेझो ओसाका या क्लबच्या मुख्य व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. त्यांच्याच कार्यकाळात ओसाका क्लबने डिएगो फरलॉन या उरुग्वेच्या जगप्रसिद्ध खेळाडूला करारबद्ध केले. तसेच, त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुणवान युवा खेळाडूंना संधी दिली व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पुढे आणले. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच त्यांना राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी संघाचे निमंत्रण मिळाले. त्यांच्या संघाने दोन वेळा सुपर लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नोंदविला.
पोपोविच यांनी त्यानंतर स्पेनमध्ये पदार्पण करून सेगुंडा डिव्हिजन मधील रिअल झारा गोहा या क्लबचे प्रशिक्षपद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ला लिगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुढच्याच मौसमात पोपोविच यांनी थायलंडच्या प्रीमिअर लीग विजेत्या बरीरॅम युनायटेड एफसी संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबने थायलंड लीग क्लब आणि मेकाँग चॅम्पियनशिप जिंकली.
पोपोविच यांच्या नेमणुकीबद्दल एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, रँन्को पोपोविच यांच्या निम्मिताने आम्हांला १५ वर्षापेक्षाही अधिक काळ प्रशिक्षक पदाचा अनुभव असलेला एक नामवंत कार्यक्षम व्यवस्थापक मिळालेला आहे. त्यांना विविध लीगमधील फुटबॉल संस्कृतींचा आणि विशेषकरून आशियांतील वैविध्यपूर्ण फुटबॉल शैलींचा मोठा अनुभव आहे. आमच्या क्लबला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. पोपोविच हे विविध भाषांमध्ये प्रविण असून खेळाडूंशी सवांद साधने आणि गुणवान खेळाडूंचा विकास घडविणे याबाबदतीत त्यांची खासियत आहे. त्यांच्या बरोबर काही वेळ घालविल्यानंतर फुटबॉलमधील त्यांच्या ज्ञानाने मी खूपच प्रभावित झालो. त्यांचे खेळाविषयीचे सखोल ज्ञान, यश मिळविण्याची जिद्द आणि भारतांतील परिस्थितीत काम करण्याची क्षमता यामुळे एफसी पुणे सिटी संघासाठी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरणार आहे.
पोपोविच म्हणाले कि, एफसी पुणे संघात सहभागी होऊन मला अतिशय आनंद झाला आहे. मोडवेल यांची खेळाविषयीची दूरदृष्टी व संघाची बांधणी करण्याची जिद्द त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला यश मिळवून देऊ यात शंका नाही.