पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे, करण कुकरेजा, पृथा वर्टीकर, स्वप्नाली नरळे या मानांकीत खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आजचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व फेरीत अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत धनश्री पवार हीचा 11/8,11/6,11/1 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. दुस-या मानांकीत स्वप्नाली नरळेने तितिक्षा पवारचा 11/5,11/3,11/8 असा तीन सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकीत प्रीती गाढवेने पृथा आचरेकरचा 11/5,11/7,11/6 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
18 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या फेरीत अव्वल मानांकीत शौनक शिंदेने अरमान जेसवानी वर 11/4,11/5,11/7 असा विजय मिळवला. दुस-या मानांकीत आरुष गलपल्ली याने सिद्धार्थ भीमपुरेला 11/6,11/8,11/3 असे नमविले तर अतितटीच्या झालेल्या सामन्यात आदित्यवर्धन त्रिमल याने वरद प्रभुणेचा 11/9,6/11,11/8,8/11,13/11 असा संघर्षपुर्ण पराभव केला.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे टेबल टेनिस विभागाचे सचिव गिरीश करंबेळकर, विद्या मुळ्ये, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, संयोजन सचिव अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:18 वर्षाखालील मुली- उपउपांत्यपुर्व फेरी
पृथा वर्टीकर(1)वि.वि.धनश्री पवार11/8,11/6,11/1
श्रुती गभाने(8)वि.वि.मयुरी ठोंबरे11/8,11/5,11/8
अनिहा डिसुझा(5)वि.वि.प्रीती साळुंके11/5,14/12,11/6
प्रीती गाढवे(4)वि.वि.पृथा आचरेकर11/5,11/7,11/6
मृण्मयी रायखेलकर(3)वि.वि.सृष्टी मिरपगारे11/2,11/3,11/4
अंकिता पटवर्धन(6)वि.वि.वैष्णवी देवघडे11/6,11/6,13/11
पूजा जोरवार(7)वि.वि.सिद्धी आचरेकर8/11,11/9,11/5,11/6
स्वप्नाली नरळे(2)वि.वि.तितिक्षा पवार 11/5,11/3,11/8
दुसरी फेरी: 18 वर्षाखालील: मुले:
शौनक शिंदे(1)वि.वि.अरमान जेसवानी 11/4,11/5,11/7
आदित्यवर्धन त्रिमल वि.वि.वरद प्रभुणे11/9,6/11,11/8,8/11,13/11
गौरव लोहपत्रे(9)वि.वि.अर्णव भालवलकर11/2,11/6,11/6
अर्चन आपटे(8)वि.वि.आदित्य जोरी11/5,8/11,11/6,12/10
आदर्श गोपाळ(5)वि.वि.मिहीर मोहिते11/6,11/8,11/6
सनत जैन वि.वि.हार्दिक क्षीरसागर11/5,11/3,11/8
श्रीयश भोसले(4)वि.वि.योगेश नाडगौडा11/1,11/2,11/5
करण कुकरेजा(3)वि.वि.प्रणव अब्दलवार13/11,11/9,11/7
साई बगाटे वि.वि.गणेश सिंग11/2,11/3,11/6
रोहित गोगटे वि.वि.जय पेंडसे6/11,11/5,11/6,11/8
मिहीर डंके(7)वि.वि.श्लोक दोभाडे11/4,11/7,11/8
आर्यन पानसे(10)वि.वि.अमिश आठवले11/7,6/11,11/8,11/7
आरुष गलपल्ली(2)वि.वि.सिद्धार्थ भीमपुरे11/6,11/8,11/3

