पुणे-नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, समृद्धी पोल, शाश्वत शुक्ला, हिमांगी गोडबोले, वाघिशा कुमार, प्रवीण ठाकरे, सानिया केळकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
तसेच, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 1500 धावपटू सहभागी झाले होते यामध्ये 500 ब्लॉईंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ झाला आणि औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग होता. एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामधुरे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला.
अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुला (40वर्षाखालील)गटात अनुराग कोंकरने 1:26:11सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, हिरेन पटेल व हरीशचंद्र लोहटकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात समृद्धी राजपूतने 1:56:39सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. याच गटात कीर्ती पोलने 2:21:28सेकंद आणि प्राची वापलेकरने 2:23:36सेकंद वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.10 किलोमीटर पुरूष खुला(40वर्षाखालील)गटात शाश्वत शुक्लाने 39:22सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओ व्हिजनचे डॉ.श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. रनबडिज् क्लबचे अरविंद बिजवे, निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार)
5 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.सानिध्य 23:50से, 2.आशिष चंदनशीव 25:23से, 3.प्रथमेश 25:40से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.वाघिशा कुमार 27:41से, 2.अवनी डोंगरे 30:21से, 3.दिया कुमार 30:49से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.प्रवीण ठाकरे 31:14से, 2.संतोष सनब 33:39से, 3.समीर तटके 34:57से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.सानिया केळकर 34:44, 2. सपना रासकर 35:23से, 3.दीपा नायर 41:24से;
10 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.शाश्वत शुक्ला 39:22से, 2.अजय कुमार 40:27से, 3.जोमन मॅथ्यू चैयान 45: 17से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.हिमांगी गोडबोले 51:33से, 2.संजना सक्सेना 52:11से, 3.स्वरा अहळूवालिया 52:47से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.पराग 43:19से, 2.सुहास अंबराळे 44:03से, 3.आशिष पुनतांबेकर 44:36से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.स्मिता कुलकर्णी 54:53से, 2.आरती मराठे 58:36से, 3.वर्षा शिंदे 1:00:20से;
15 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.तहसीन खान 1:11:04से, 2.सागर लुईटेल 1:21:06से, 3.आलोक चौथरी 1:23:10से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.कुझांग डोल्मा 1:43:05से, 2.रश्मी महाजन 1:44:43से, 3.मोनिशा शर्मा 1:49:29से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.श्रीगणेश नाडगौडा 1:11:15से, 2.रोहित कुंडणया 1:24;51से, 3.सागर कवळे 1:25:38से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.शिल्पा सरनाईक 1:57:05से, 2.नीला ननावरे 2:35:27से;
अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर): पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.अनुराग कोंकर 1:26:11से, 2.हिरेन पटेल 1:33:47से, 3.हरीशचंद्र लोहटकर 1:36:21से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.समृद्धी राजपूत 1:56:39से, 2.कीर्ती पोल 2:21:28से, 3.प्राची वापलेकर 2:23:36से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.संजय पंडित 1:33:51से, 2.प्रसाद मिझार 1:43:58से, 3.निखिल दाता 1:45:22से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.चैनया पाध्ये 1:39:07से, 2.कविता रेड्डी 1:44:46से, 3.तन्मयी करमरकर 1:54:28से.