पुणे: राजेश वाधवान यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघ व संघाचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. फ्रॅंचाईजीने परस्पर सामंजस्याने मुख्य प्रशिक्षक हब्बास तसेच सहाय्यक प्रशिक्षक मिग्युएल मार्टिनेझ गाेन्झालेझ यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.
हब्बास दीड वर्ष एफसी पुणे सिटी संघाचे प्रशिक्षक हाेते. या कालावधीत त्यांनी केलेले काम नक्कीच समाधान देणारे हाेते. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा. नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड लवकरच केली जाईल, असेही फ्रॅंचाईजीने कळवले आहे.
हब्बास म्हणाले,एफसी पुणे सिटीबराेबरचा अनुभव विलक्षण हाेता. आता आयएसएलचा माेसम नव्या कार्यक्रमानुसार खूप लांबणार आहे. मी अन्य काही जणांना शब्द दिला असल्यामुळे मी एफसी पुणे सिटी संघासाेबत राहू शकणार नाही. दीड वर्षाच्या कालावधीत कंपनीते पदाधिकारी, व्यवस्थापन, खेळाडू या सगळ्यांनीच सहकार्य केले. मी त्यांचा सदैव आभारी राहिन. नव्या माेसमासाठी क्लबला माझ्या शुभेच्छा.