पीएमडीटीएच्या अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती

Date:

  • उपाध्यक्षपदी प्रशांत सुतार व खजिनदारपदी कौस्तुभ शहा यांची निवड 
पुणे, दि.4 सप्टेंबर 2017ः पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)च्या 2017-2021च्या कालावधीसाठी पुणेस्थित उद्योजक व टेनिसप्रेमी किशोर पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर व प्रशांत सुतार यांची पीएमडीटीएच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे शनिवारी झालेल्या पीएमडीटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड यादी जाहिर करण्यात आली. किशोर पाटील हे उत्सुक टेनिस खेळाडू असून त्यांनी टेनिस खेळाच्या प्रचारासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे आणि केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेसह आयटीएङ्ग कुमार टेनिस स्पर्धा शहरांत गेल्या 4 वर्षापासून आयोजन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावर्षी मार्च महिन्यात पीएमडीटीएचे अध्यक्ष अरूण साने यांचे दु:खद निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी किशोर पाटील यांची निवड करण्यात आली. 
पीएमडीटीएच्या सचिवपदी अभिषेक ताम्हाणे यांची, तर संघटनेच्या खजिनदारपदी कौस्तुभ शहा यांची निवड करण्यात आली आहे. प्रौढ टेनिसपटू जयंत कढे व हिमांशु गोसावी यांची सहसचिवपदी तर, हेमंत बेंद्रे, शितल अय्यर, मिहिर दिवेकर, उमेश माने, समीर भामरे व आश्विन गिरमे यांची संघटनेच्या नवीन कार्यकारिणी सभासद म्हणून  निवड करण्यात आली आहे. 
भारतांतील सध्या टेनिसची राजधानी असलेल्या पुणे शहरांत 2000हून अधिक खेळाडू, 15 सर्टिफाइड ऑफिशियल्स , 3 लेव्हल 7 प्रशिक्षक, 11 लेव्हल 5 प्रशिक्षक, 20 लेव्हल 4 प्रशिक्षक आणि 16 लेव्हल 3 प्रशिक्षकांचा समावेश आहे. 2013-2017 या कालावधीत पीएमडीटीएच्या मान्यतेखाली 100हून अधिक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या असून यामध्ये कुमार टेनिस लीग स्पर्धांचा समावेश आहे. तसेच, 16 आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच शहरांत 43 वर्षाच्या कालावधीनंतर भारत व न्युझीलंड यांच्यात ऐतिहासिक डेव्हिस करंडक लढतदेखील घेण्यात आली आहे. 
याशिवाय जिल्हा मानांकन गुण, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा, पुणे जिल्ह्यांतील अव्वल 8 खेळाडूंना वार्षिक शिष्यवृत्ती व वार्षिक पुरस्कार, आंतर क्लब अजिंक्यपद स्पर्धा, पुणे व पीसीएमसीसाठी कार्यशाळा व शिबिर, प्रशिक्षक व ऑङ्गिशियल्स व साहित्य आणि जिल्ह्यांतील गरजू व गुणवान खेळाडूंना आर्थिक पाठिंबा यांसारखे विविध उपक‘म संघटनेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. 
 
*2017-2021वर्षासाठी नवीन व्यवस्थापकीय समिती खालीलप्रमाणेः 
अध्यक्षः किशोर पाटील; उपाध्यक्षः सुंदर अय्यर व प्रशांत सुतार; सचिवः अभिषेक ताम्हाणे; सहसचिवः जयंत कढे, हिमांशु गोसावी; खजिनदारः कौस्तुभ शहा; कार्यकारिणी सभासदः उमेश माने, हेमंत बेंद्रे, मिहिर दिवेकर, शितल अय्यर, समीर भामरे, आश्विन गिरमे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...