पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे 14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने इंडियन ऑईल संघाचा 4-2असा पराभव करून सांघिक बिलियर्ड्स व स्नूकर या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत इंडियन ऑईलचा 4-2असा पराभव केला. पहिल्या सामन्यात पंकज अडवाणीने आपले कौशल्य पणाला लावत लक्ष्मण रावतचा 2-0(59-7, 55-43)असा सहज पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सौरव कोठारीने पहिल्या फ्रेममध्ये ब्रिजेश दमानीचा 89(69)-10 असा तर दुसऱ्या फ्रेममध्ये ब्रिजेश दमानीने सौरव कोठारी 58-11असा पराभव केला. याआधी या स्पर्धेत ओएनजीसी संघाला बिलियर्ड्स सांघिक गटाचे विजेतेपद सहज प्राप्त झाले होते. पण सांघिक स्नूकर गटाच्या स्पर्धेसाठी ओएनजीसीला चांगलेच झगडावे लागले. इंडियन ऑईलच्या आदित्य मेहताने तिसऱ्या सामन्यात कसोशीने प्रयत्न केले व पहिली फ्रेम आलोक कुमारविरुद्ध 72-62 अशी जिंकली. पण अनुभवी आलोक कुमारने वरचढ खेळ करत आदित्य मेहताविरुद्ध हि फ्रेम 49-38अशी जिंकून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत बीपीसीएल संघाने जीएआयएलचा 4-2असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
हौशी बिलियर्ड्स गटात अंतिम फेरीत आरिफ अख्तरने अम्रिशचा 145-100अशा फरकाने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: स्नूकर: अंतिम फेरी:
ओएनजीसी वि.वि.इंडियन ऑईल 4-2(पंकज अडवाणी वि.लक्ष्मण रावत 2-0(59-7, 55-43); सौरव कोठारी वि.ब्रिजेश दमानी 1-1(89(69)-10, 11-58); आलोक कुमार वि.आदित्य मेहता 1-1(62-72, 49-38);
3 व 4थ्या क्रमांकासाठी लढत:
बीपीसीएल वि.वि.जीएआयएल 4-2(इशप्रित चड्डा वि.मनन चंद्रा 1-1(13-93, 63-39); आशुतोष पाधी वि.शाहबाज खान 1-1(64-37, 39-65); एस श्रीकृष्णा वि.अशोक कुमार 2-0(80-04, 66-02);
हौशी बिलियर्ड्स गट: उपांत्यपूर्व फेरी:
अम्रिश वि.वि.जे फुकन 123-61;
आतिश कुमार वि.वि.स्वप्नव डी 145-105;
एस बरुआ वि.वि.प्रदीप शेट्टी 112-49;
आरिफ अख्तर वि.वि.तोलन बरुआ 172-56;
उपांत्य फेरी:
आरिफ अख्तर वि.वि.एस बरुआ 161-72;
अम्रिश वि.वि.आतिश कुमार 133-64;
अंतिम फेरी:
आरिफ अख्तर वि.वि.अम्रिश 145-100;

