पुणे नस्या महाराष्ट्र तर्फे नस्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे अनावरण 17 फेब्रुवारी 2018 रोजी डेक्कन रन्डेवझ हॉटेल येथे राजेश पांडे व एमसीआयएमचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता यांच्या उपस्थितीत होणार आहे.
ही स्पर्धा 22 ते 25 मार्च दरम्यान भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली येथे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयांसाठी भरवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत 35 महाविद्यालयांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
अधिक माहिती देताना नस्या महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. सुकुमार सरदेशमुख म्हणाले की, नस्या महाराष्ट्र ही संस्था आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहे. याशिवाय आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत 500हुन अधिक विद्यार्थी आणि वैद्य सहभागी होणार आहेत तसेच 1000हून अधिक विद्यार्थी आणि वैद्य प्रेक्षक येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेला एमयुएचएस आणि एमसीआयएम यांचा पाठिंबा मिळाला आहे.
स्पर्धेत अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, पीडीइएस सीएआरसी, आकुर्डी, एसएसएएम हडपसर, भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज, बीएसडीटीएएम वाघोली, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अण्णासाहेब डांगे, राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, एसव्हीएनएच आयुर्वेद महाविद्यालय राहुरी, संगमसेवा भावी ट्रस्टआयुर्वेद महाविद्यालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय शेगांवनगर, सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर, आश्विनी रूरल आयुर्वेद कॉलेज, पोद्दार आयुर्वेद कॉलेज, एसएमटीकेजे मित्तल आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद प्रसारक मंडल्स आयुर्वेद महाविद्यालय सायन, श्री एनकेडी ट्रस्ट नालासोपारा आयुर्वेदिक महाविद्यालय, वायएमटी आयुर्वेद महाविद्यालय खारघर, एचएसपीएम आयुर्वेद मेडिकल कॉलेज पेठ वडगांव, यशवंत आयुर्वेद महाविद्यालय कडोळी, एलकेआर आयुर्वेद महाविद्यालय गढहिंग्लज, डॉ जेजे मकदूम आयुर्वेद महाविद्यालय जयसिंगपूर, बीएसपीएम धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर, आर्यांग्ला वैद्यक महाविद्यालय, रूरल इन्स्टिटयूट ऑफ आयुर्वेद मायनी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, एसइएस आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी, एसएमबीटी सेवाधारी ट्रस्ट इगतपुरी, जगदंब आयुर्वेद सोसायटी कॉलेज येवला, सीएसएमएस आयुर्वेद महाविद्यालय कांचनवाडी, शिवा ट्रस्ट यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक कॉलेज हे पुणे, सांगली, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सातारा, उस्मानाबाद, नाशिक येथून 35 महाविद्यालयांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला 31,000 आणि उपविजेत्या संघाला 21,000 अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.