Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत स्पार्टन्स, वाडेश्वर विझार्डस संघांचे विजय

Date:

पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत  स्पार्टन्स, वाडेश्वर विझार्डस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित परांजपे याच्या नाबाद ४२धावांच्या खेळीच्या जोरावर  स्पार्टन्स संघाने  हॅट्ट्रिक संघाचा ७ गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना  अभिजित तावरे ३०, नितीन हार्डीकर १५ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर हॅट्ट्रिक संघाने ७षटकात ५बाद ६८धावा केल्या. स्पार्टन्सकडून  यश परांजपे(२-६), पराग चितळे(२-१६), ऋषिकेश मोने(१-९)यांनी सुरेख गोलंदाजी केली. ६८धावांचे आव्हान  स्पार्टन्स संघाने ६.४ षटकात २बाद ६९धावा करून पूर्ण केले. यात अमित परांजपेने २० चेंडूत ३चौकार व ३षटकारांच्या मदतीने नाबाद ४२धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अमितला  पराग चितळेने १० चेंडूत नाबाद १३धावा काढून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी अमित परांजपे ठरला. अन्य लढतीत कर्णा मेहता(४२धावा व  २-७)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्डस संघाने सिटी प्राईड संघावर ११धावांनी विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली.  हर्षद बर्वे(२६धावा व १-७)याच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर  मोटिव्हेटर्स संघाने एम.जे.वुल्वस्‌चा ३०धावांनी पराभव केला.  शैलेश बांगळे (४५धावा)याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर हॅट्ट्रिक संघाने मोटिव्हेटर्स संघाचा ८गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
हॅट्ट्रिक: ७षटकात ५बाद ६८धावा(अभिजित तावरे ३०(१६), नितीन हार्डीकर १५, यश परांजपे २-६, पराग चितळे २-१६, ऋषिकेश मोने १-९)पराभूत वि.स्पार्टन्स: ६.४ षटकात २बाद ६९धावा(अमित परांजपे नाबाद ४२(२०), पराग चितळे नाबाद १३(१०), संग्राम चाफेकर १-८, निखिल दीक्षित १-१३);सामनावीर-अमित परांजपे;
वाडेश्वर विझार्डस: ७षटकात ७बाद ७८धावा(कर्णा मेहता ४२(२x१,५४,१x६),साकेत गोडबोले १३(८), निखिल मुंडे २-९, सचिन गोडबोले २-२१, श्रीनिवास चाफळकर १-७)वि.वि.सिटी प्राईड: ७षटकात ५बाद ६७धावा(गौरव चाफळकर २८(१५), श्रीनिवास चाफळकर १७(१०), कर्णा मेहता २-७);सामनावीर-  कर्णा मेहता;
मोटिव्हेटर्स: ७षटकात ३बाद ७७धावा(हर्षद बर्वे २६(१४), रोहित बर्वे नाबाद २४(१४), रोहित भालेराव १-११)वि.वि.एम.जे.वुल्वस्‌: ७षटकात ७बाद ४७धावा(निरंजन गोडबोले २०(१५), तेज दीक्षित १०, समीर जोग २-६, हर्षद बर्वे १-७, रोहित बर्वे १-१६);सामनावीर-हर्षद बर्वे;
मोटिव्हेटर्स: ७षटकात ६बाद ७६धावा(शार्दूल वाळिंबे ३५(१८), विक्रांत पाटील १६, साहिल गोवित्रीकर ११, रोहित बर्वे ६, अनिलेश वाघचौरे ३-२२)पराभूत वि.हॅट्ट्रिक: ७षटकात १बाद ७९धावा(शैलेश बांगळे ४५(२२,२x४,४x६), निखिल दीक्षित नाबाद २७(१५), हर्षद बर्वे १-२१);सामनावीर-शैलेश बांगळे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...