युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी
पुणे- मलेशिया येथे झालेल्या युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगने अव्वल पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत मुलांच्या 10 वर्षाखालील गटात आर्यमानने 18 होल्सची ही स्पर्धा 3 दिवसांत पुर्ण करून पाचवे स्थान संपादन केले.
ही स्पर्धा म्हणजे यूएस किड्स गोल्फ स्पर्धेची आंतरराष्ट्रीय आवृत्ती असून दर वर्षी आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा 5 ते 18 वर्षे वयोगटातील कुमार गोल्फपटूंसाठी खूली असते. या प्रत्येक गटातील अव्वल 5 खेळाडूंची स्कॉटलंड येथे होणा-या युरोप अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
तॉंजॉंग पुटेरी गोल्फ रिझॉर्ट येथे 3 चॅम्पियनशिप कोर्सेस ही स्पर्धा 6 वर्ष पार पडत आहे. स्पर्धेत 26 देशांमधुन एकुण 300हून अधिक कुमार गोल्फर्सनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये युएस, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, मॉरिशियस, म्यानमार, फिलिपिन्स, भारत, जपान, केनि,या सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, हॉंग कॉंग, कॅनडा, चीन, ग्रेट ब्रिटन व फ्रांस या देशांचा समावेश होता.
तॉंजॉंग पुटेरी गोल्फ रिझॉर्ट, व्हिलेज कोर्स येथील स्पर्धेत वेस्ट झोन विभागात अव्वल पाचवे स्थान पटकावणारा आर्यमान हा पहिला कुमार गोल्फर आहे.
व्यावसायिक स्तरावरील गोल्फ स्पर्धांचा दर्जा पाहताना कुमार गटातील स्पर्धकांसाठी 18 होल्स चॅम्पियनशिप कोर्स ही स्पर्धा खडतर अशी आहे. या व्हिलेज कोर्समध्ये 18 पैकी 13 होल्स भोवती वॉटर बॉडीज् असतात आणि या होल्सच्या ग्रिन्स भोवती स्पर्धकांसाठी आव्हानात्मक ठरणारे अनेक बंकर्स ठेवण्यात आले होते. आर्यमानच्या कामगिरीचे वैशिष्ट असे की, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिस-याच होलला त्याने आपली सर्वात वाईट कामगिरी नोंदविली होती. परंतू 18व्या होलला त्यांने बर्डीची नोंद करताना ही पिछाडी भरून काढली.