अॅमडॉक्स,सिमेंस, एल अॅड टी इन्फोटेक संघांची आगेकुच

Date:

पुणे,दि– आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत अॅमडॉक्स,सिमेंस व एल अॅड टी इन्फोटेक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निखिल पेंढारकरच्या 71 धावांच्या बळावर अॅमडॉक्स संघानेपर्सिस्टंट सिस्टीमस् संघाचा 11 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅमडॉक्स संघाने 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. भावनीश कोहलीने 46धावा करून निखिलला सुरेख साथ दिली. 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पर्सिस्टंट सिस्टीमस् संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 148 धावांत रोखला. अॅमडॉक्स संघाकडून अवेश सय्यदने 3 तर भावनीश कोहली व मितेश मयेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. निखिल पेंढारकर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत विशाल रैनाच्या जलद नाबाद 98 धावांच्या जोरावर सिमेंस संघाने एक्ट्रीम वेबटेक संघाचा 122 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सिमेंस संघाने 20 षटकात 5 बाद 201 धावा केल्या. यात हिमांशू अगरवालने दमदार अर्धशतकी खेळी करत विशालला सुरेख साथ दिली. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलीग करताना हिमांशू अगरवाल, राजेश धालपे व संजय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एक्ट्रीम वेबटेक संघ केवळ 16.4 षटकात सर्वबाद 79 धावांत गारद झाला. विशाल रैना सामनावीर ठरला.

तिस-या लढतीत अतितटीच्या झालेल्या सामन्यात एल अॅड टी इन्फोटेक संघाने यार्डी संघाचा केवळ 2 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्नेहल खामणकरच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर एल अॅड टी इन्फोटेक संघाने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वप्निल घाटगेच्या नाबाद 114 धावाची दमदार खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही व यार्डी संघने 20 षटकात 3 बाद 190 धावा केल्या. स्नेहल खामणकर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

अॅमडॉक्स- 20 षटकात 9 बाद 159 धावा(निखिल पेंढारकर 71, भावनीश कोहली 46, अमरप्रीत जसपाल 4-9) वि.वि पर्सिस्टंट सिस्टीमस्- 20 षटकात 9 बाद 148 धावा(कौस्तूभ काळे 29, सुशांत बन्सल 33, सारंग साठे 21, भावनीश कोहली 2-22, मितेश मयेकर 2-25, अवेश सय्यद 3-27) सामनावीर- निखिल पेंढारकर 

अॅमडॉक्स संघाने 11 धावांनी सामना जिंकला. 

सिमेंस- 20 षटकात 5 बाद 201 धावा(विशाल रैना नाबाद 98(54), हिमांशू अगरवाल 53 (38), अतूल पवार 27, प्रशांतो मुखर्जी  2/38) वि.वि एक्ट्रीम वेबटेक- 16.4 षटकात सर्वबाद 79 धावा(मितेश सायनी 24, हिमांशू अगरवाल 3/18, राजेश धालपे 2-6, संजय पाटील 2-10) सामनावीर- विशाल रैना

सिमेंस संघाने 122 धावांनी सामना जिंकला. 

एल अॅड टी इन्फोटेक- 20 षटकात 5 बाद 192 धावा(स्नेहल खामणकर नाबाद 101, कुंतल देब 22, अरमान पटनाईक 27,  विकास भागवत 21, प्रमाद दवंडे 2-27) वि.वि यार्डी- 20 षटकात 3 बाद 190 धावा(स्वप्निल घाटगे नाबाद 114(67), गौतम तुळपुळे 33, वैभव जगताप 2-27) सामनावीर- स्नेहल खामणकर

एल अॅड टी इन्फोटेक संघाने 2 धावांनी सामना जिंकला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...