भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र १७ , लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि रघुवंशी युवा मंच यांच्या सहकार्यांने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Date:

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र १७ , लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि रघुवंशी युवा मंच यांच्या सहकार्यांने कै. नथुराम उर्फ अण्णा कोंढरे व कै. सुलोचना नथुराम कोंढरे यांच्या स्मरणार्थ भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . मोहंमदवाडी येथील ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली . तसेच  पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले .

या शिबिराचे उदघाटन नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते करण्यात आले . या शिबिरामध्ये ५७० नेत्रतपासणी , ५०० मोफत चष्मे वाटप व ५७ अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले . तसेच आधार रक्तपेढीच्या सहकार्याने सुमारे ५० पिशव्या रक्त संकलित करून रक्तदान शिबीर घेण्यात आले .

यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस तेजेंद्र कोंढरे , भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे , सरचिटणीस प्रमोद कोंढरे , पालक संजयमामा देशमुख , भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष अरविंद कोठारी ,स्वीकृत नगरसेवक छगन बुलाखे , राजू परदेशी , रोहिणी नाईक , लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता , नितीन ठक्कर , जयेश तन्ना , आशा ओसवाल , कल्पेश पटणी, रघुवंशी युवा संघाचे अध्यक्ष रवि बुधानी , भरत अजत , भावीन ठक्कर , जिग्नेश ठक्कर , रमेश ठक्कर  आदी मान्यवर उपस्थित होते .

या शिबिरासाठी  ह. वि. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ महेश पवार ,डॉ अलका शिंदे ,  जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस तेजेंद्र कोंढरे व जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी  पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि , आरोग्य शिबिराचा उपक्रम कौतकास्पद असून प्रभागातील प्रत्येक नगरसेवकाने आरोग्य शिबीर घेणे गरजेचे आहे . प्रत्येक नागरिकाने आपली आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज बनली आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...