पुणे-पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (एफटीआय) मध्ये शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्विन अनुराग शुक्ला (वय 32) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून ताे मूळचा साल्वादाेर नाॅर्थ गाेवा याठिकाणचा रहिवासी हाेता.याबाबत डेक्कन पाेलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. डेक्कन पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाेलिस नियंत्रण कक्षास लाॅ काॅलेज रस्त्यावरील एफटीआय महाविद्यालयात मुलांच्या जुन्या हाॅस्टेलमध्ये आत्महत्येसारखा प्रकार घडला असल्याचा फोन आला. खाेलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यानुसार डेक्कन पाेलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित ठिकाणी बी ब्लाॅक रुम क्रमांक एस-12 च्या दरवाजाच्या वरील खिडकीतून पाेलीसांनी आत डाेकवून पाहिले असता सदर खाेलीत राहणाऱ्या आश्विन शुक्ला या विद्यार्थ्याने खिडकीला नायलाॅनच्या दाेरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पाेलिसांनी अग्नीशामक दलाच्या जवनांना घटनास्थळी बाेलवुन घेत आतून बंद असलेला दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.
प्रथमदर्शनी हा प्रकार हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिसून येत आहे. बाजूलच्या खाेलीत राहणाऱ्या मुलांनी अश्विन शुक्ला यास शेवटचे मंगळवारी पाहिल्याचे सांगितले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कोणती सुसाईट नाेट लिहिली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेल नाही. त्यामुळे नेमकी त्याने आत्महत्या काेणत्या कारणास्तव केली याचा उलगडा अजूनतरी झालेला नाही. याबाबत अधिक तपास डेक्कन पाेलिस करत आहे.