‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समूहाचा वर्धापनदिन, विवेकानंद जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ व ‘सुदर्शन न्यूज’ च्या वतीने ‘सामाजिक कार्यकर्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
गुरुवार, दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष होते. या कार्यक्रमात कृष्णकुमार गोयल, ‘सजग नागरिक मंच’ चे विवेक वेलणकर, डॉ. दत्ता कोहिनकर, कर्नल सुरेश पाटील, संजय परदेशी, स्वामी अभिषेक, सचिन शिंदे इतर विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते
सुनील जोशी (जलबिरादरी), प्रज्ञा गोडबोले (दे आसरा फाऊंडेशन), तन्मय कानिटकर (परिवर्तन), अशोक देशमाने (स्नेह-वनश्री), प्रसाद आगाशे (सेंद्रीयभूमी फाऊंडेशन) , अक्षय महाराज भोसले यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्काराने गौरविण्यात आले
‘सुदर्शन न्यूज’च्या शिल्पा देशपांडे, रमेश आगरवाल, अॅड. कान्होपात्रा गायकवाड, नारायण फड , गजऋषी उपस्थित होते.