सरकारने वन जमिनींवरील रहिवाश्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय अशा दुर्घटना थांबवता येणार नाहीत-प्रविण दरेकर

Date:

मुंबई दि.११ जून : वन जमिनींवरील रशिवाश्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाचा प्रश्न असून तो सोडवल्याशिवाय आणि त्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय अशा दुर्घटना थांबवता येणार नाहीत. नाहक गरीब माणसांना जीव गमवावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ दहिसरच्या चव्हाण चाळ, शंकर मंदिराजवळ केतकीपाडा येथे 3 घरं कोसळली. यात प्रद्युम्न सरोज नावाच्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज विधान परिषदेचे विरोधी।पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन आपद्ग्रस्तांच्या अडचणी समजून घेतला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार गोपाळ शेट्टी हे देखील होते. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हजारोच्या संख्येने एसआरए स्कीम अर्थवट स्थितीत आहेत. बिल्डरांकडून पुनर्वसनासाठी बाहेर काढलेल्या लोकांना भाडे देखील मिळत नाही. पुनर्वसन योजना तातडीने पूर्ण करणे, तोपर्यंत भाडे देणे, या गोष्टींचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु, दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. यापूर्वी आम्ही दोन चार एसआरए स्कीमची कामे थांबवली. कारण, ते लोकांना भाडे देत नव्हते. ठराविक काळात प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना झाला होता, पण त्याची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.
वनजमिनीवरील रहिवाश्यांचे पुनर्वसन जवळच्या एसआरए योजनांमध्ये करण्याबाबतही पूर्वीच्या काळात निर्णय झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, आणखी पाठपुरावा करून या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू, असेही दरेकर म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...