पुणे- सेंट जोसेफ इंजिनिअरिंग कॉलेज मंगरूळ (कर्नाटक) येथे झालेल्या नॅशनल लेवल व्हर्चुअल हॅकॅथॉन २०२० स्पर्धेमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकाविले. अक्षदा गोगावले, वैष्णवी पवार, सुवर्णा पाटील व शुभम मोहिते या विद्यार्थ्यांनी १० मार्च २०२१ रोजी मंगरूळ (कर्नाटक) मध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील व्हर्चुअल हॅकॅथॉन २०२० स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रथम पारितोषिक पटकाविले.
सेंट जोसेफ इंजिनिअरिंग कॉलेज व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी), इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल भारत सरकार तर्फे नुकतीच हि स्पर्धा घेण्यात आली. ग्रीन हॅकॅथॉन २०२० : वेस्ट हॅन्ड्लिंग मॅनेजमेंट हि या स्पर्धेची संकल्पना होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ओपन ट्रॅक थीम मध्ये रिकव्हरी २०२० : ईकॉनॉमिकल डिझाईन फॉर बल्ब क्रसिंग युनिट अँड ईफेक्टीव मॅनेजमेंट ऑफ व्हेईक्यूलर वेस्ट बल्ब या संकल्पनेवर सादरीकरण केले. या प्रकल्पामुळे बल्बचे विघटन प्रक्रियेमध्ये जमीन, पाणी व पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार असल्याने राष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पाची नोंद घेण्यात आली.
या विद्यार्थ्यांनी प्रा. सागर गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे , सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
नॅशनल लेवल व्हर्चुअल हॅकॅथॉन २०२० स्पर्धेमध्ये अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश
Date:

