पुणे- आंदेकर ;माळवदकर अशा टोळ्यांची नावे ऐकलेल्या पुण्यात आता शर्मा , गुप्ता अशा गुन्हेगारांची नावे ऐकायला येऊ लागली आहेत .मार्केड यार्डात गोळीबार करत २८ लाखाची रोकड नोव्हेंबर महिन्यात लुटून नेणाऱ्या गुप्ता टोळीवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मोकांतर्गत कारवाई केली आहे. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर पदाचा पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी विरूध्द केलेली ०५ वी मोका ची कारवाई आहे.
मोक्का लावलेल्या या टोळीचा म्होरक्या अवघ्या २० वर्षाचा असून त्याचे नाव अविनाश रामप्रताप गुप्ता असे आहे तो व त्याचे १२ साथीदार यांचेविरूध्द मोका ची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली .
या संदर्भात पोलिसांनी असे म्हटले आहे कि,’आरोपी नामे अविनाश रामप्रताप गुप्ता, वय २० वर्षे, रा. वेदगौरव सोसा. फ्लॅट नं. १३, शिंदे पुल, शिवणे, पुणेयाने आपल्या इतर १२ साथीदारां सोबत संघटित टोळी तयार करुन, दिनांक १२/११/२०२२ रोजी फिर्यादी व त्यांचे भागिदार असे दोघेजण मार्केटयार्ड मधील ऑफिसमध्ये कामकाज करीत असताना, सदरच्या ऑफिसमध्ये
साथीदारांसह येवुन, फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन २८ लाख रुपये व त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावुन घेतला. तसेच काऊंटरवरील मोबाईल घेऊन ते सर्वजण निघुन गेले. त्याबाबत त्यांचेवर मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १७३/२०२२, भादविक ३९५,३९७, १२०(ब) आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५), मपोकाक ३७(१)(३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचेविरूध्द शरिराविरूध्द व मालाविरूध्द गुन्हे दाखल आहेत.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे अविनाश रामप्रताप गुप्ता, वय – २० वर्षे, रा. वेदगौरव सोसा. फ्लॅट
नं. १३, शिंदे पुल, शिवणे, पुणे ( टोळी प्रमुख) २. आदित्य अशोक मारणे, वय – २८ वर्षे, रा. कामगार विकास
सोसायटी,दत्तनगर,वारजे माळवाडी, पुणे, ३. अजय बापु दिवटे, वय २३ वर्षे, रा. रामनगर, वारजे, पुणे ४ निलेश बाळु
गोठे, वय २० वर्षे, रा. मंगळवार पेठ पुणे ५. विशाल सतिश कसबे, वय २० वर्षे, रा. २३०, मंगळवार पेठ, पुणे, ६.
दिपक ओमप्रकाश शर्मा, वय १९ वर्षे, रा. राहुल नगर, शिवणे, पुणे, ७. गुरुजन सिंग सेवासिंग विरग, वय २२ वर्षे,
रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे ८. संतोष बाळू पवार, वय २३ वर्षे, रा. पानशेत रोड, खानापूर, हवेली, जि. पुणे ९ )
साई राजेंद्र कुंभार, वय १९ वर्षे, रा. मु. पो. खानापुर, ता. हवेली, जि. पुणे १० एक विधीसंघर्षित बालक व पाहिजे(wanted) इतर
तीन आरोपी यांचेसह अन्य सदस्यांसाठी अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने धमकी देवुन,धाकदपटशा जुलुम जबरदस्तीने किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा बेकायदेशीर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, जाळपोळ, दरोडा करणे या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक करवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिर आर्थिक फायदया करीता प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आल्याने वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीमती. अनघा देशपांडे यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून दाखल असलेल्या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii),३ (२), ३ (४) अंतर्भाव करण्याची अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मायांनी मान्यता दिली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा पोलीस आयुक्तवानवडी विभाग पुणे श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनघा
देशपांडे,पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्रीमती सविता ढमढेरे, सहा. पोलीस निरीक्षक, रामदास मुंढे, पोलीस उप-निरीक्षक, चेतन भोसले, तसेच सर्व्हेलन्स पथकातील अंमलदार, विरेंद्र ढवाण व अमरनाथ लोणकर यांनी केलीआहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर
हे करीत आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर
बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे
सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर
देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली
मोक्का अंतर्गत केलेली ही ०५ वी कारवाई आहे.