१३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी व्यापाऱ्यास राज्य जीएसटी पुणे विभागाकडून अटक

Date:

पुणे, दि.24- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात आपली कार्यवाही चालू आहे. १३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्यास राज्य जीएसटी पुणे विभागाकडून 22 जून 2021 रोजी पुणे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली आहे.
ओमप्रकाश तिरथदास सचदेव यांनी मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी त्याच्या स्वतःच्या नावे तसेच मे. ट्रेडर्स भावरे, में. प्रकाश ट्रेडर्स, में. अगरवाल इंटरप्रायजेस, में. कोल्हे सेल्स, में. किरण ट्रेडिंग कंपनी, में. नारायण ट्रेडर्स, में. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड में सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या इतर व्यक्तीच्या नावे स्थापन करून वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ अंतर्गत नोंदणी दाखले घेतले.
या कंपन्याच्या माध्यमातून ओमप्रकाश तिरथदास सचदेव याने १३०.०५ कोटी रकमेची खोटी देयके देऊन १९.७९ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठयाशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे २२. ४८ कोटी रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. हे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियमाच्या कलम १३२ (ब) व (क) प्रमाणे गुन्हा असून १३२ (५) प्रमाणे दखलपात्र व अजामीन पात्र आहे. तसेच कलम १३२(१) (i) प्रमाणे सदरहू गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
ओमप्रकाश तिरथदास सचदेव, यास मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच कारवाई दरम्यान अशा प्रकारच्या बोगस कंपन्यांची माहिती पुणे राज्य वस्तू व सेवाकर विभाग यांना मिळालेली असून त्यांच्याविरुद्ध नजीकच्या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे.
अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे आणि राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यकर उपायुक्त दि. भा. देशमुख, सहायक राज्यकर आयुक्त बाबासाहेब जुंबड यांच्या प्रयत्नातून ही अटक कार्यवाही झाली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...