मुंबई – नामचंद सौंदयवती “पवळा”यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागात सापडत नसल्याने , सध्या सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडून निर्णय घेणे आता लांबणीवर पडला आहे. असे कळते.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव – पावसा येथे कलावती पवळा तबाजी भालेराव ह्या पहिल्या स्त्री कलाकार म्हणून रंगमंचावर आल्या आहेत.शीघ्र कवी पठ्ठे बापूराव -पवळा या जोडगोळीने कला क्षेत्राला स्फूर्ती दिलेली आहे.
इ.स. ११०८-०९ च्या सुमारास पठ्ठे बापूराव – पवळा हे दोघे कोल्हापूरला गेले.तेथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समोर “मिठाराणी”हा गाजलेला वग सादर केला.
अशा प्रतिभावंत महिला कलाकार असणाऱ्या “पवळा”यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कार सुरू करावा.असे राज्याचे महसूल मंत्री आणि संगमनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असलेले ना. बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा दिनांक- २१ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी पत्र दिले आहे.पण त्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवर करीत आहे. पवळा यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील आहे. तो मतदार संघ ना .बाळासाहेब थोरात यांचा आहे. त्यामुळे निश्चित यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी त्यांची अपेक्षा होती। पवळा केवळ “विशिष्ट जाती”च्या महिला कलाकार असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग संबंधित प्रस्ताव सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे पाठविण्यास विलंब करीत आहे? अशी शंका ही काहींनी उपस्थित केली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे सदर निर्णय घेण्यास सकारात्मक आहेत,पण विभाग प्रस्तावच पाठवित नसल्याने निर्णय लांबणीवर पडला आहे.
आज कै विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार घोषित करायला सुद्धा खूप उशीर झाला आहे.हा ही प्रस्ताव विभागाने सांस्कृतिक कार्य मंत्री महोदयांकडे न पाठविल्याने मंत्री कार्यालय चांगलेच हतबल झाले असल्याचे कळते.
पवळा” यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रस्ताव सापडेना, त्यामुळे निर्णय लांबणीवर..!
Date:

