श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या शनिवारवाडा येथील पुतळ्यासाठी अखेर जिन्याची उभारणी

Date:

आज पुण्यतिथी दिनी महापौरांच्या हस्ते पूजन व कामाला सुरुवात

पुणे-श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी जिना करावा म्हणून ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. महासंघाने स्वतःच्या निधीतून जीना उभारण्याची घोषणा केल्यावर तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ व भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महासंघाचे पदाधिकारी व मनपा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली व 18 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यतिथी दिनापर्यंत जीना उभारण्याची घोषणा केली. आज श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या 282 व्या पुण्यतिथी ला या जिन्याच्या कामाचे भूमिपूजन माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनपा सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मदन सिन्नरकर, मयुरेश अरगडे, बाजीराव पेशवा समितीचे कुंदनकुमार साठे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सनई चौघड्याच्या निनादात मंगलमय वातावरणात महिलांनी फुगड्या घालून ह्या उभारणीचा सोहळा साजरा केला. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बाजीराव पेशवा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले ” की अनेक अडथळे पार करून आज आपल्याला येथे जीना उभारण्यात यश येत आहे त्यामागे ब्राह्मण महासंघाचा पाठपुरावा महत्वाचा आहे. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्मारक आणि पुतळ्यांची योग्य निगा राखली जावी व तेथील पावित्र्य जपले जावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.” संदीप खर्डेकर यांनी आपल्या संबोधनात ब्राह्मण महासंघाच्या कार्याचा गौरव केला व मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पान मुद्रांकित करणारे अपराजित योद्धा बाजीराव पेशवा यांच्या ह्या सुंदर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज जींना उभारणीस सुरुवात होत असून येत्या तीन दिवसात हे काम पूर्ण होईल असे सांगितले. तसेच हा केवळ ब्राह्मण महासंघाचा विषय नसून समस्त मराठी माणसाला अभिमान वाटावा असे कर्तृत्व गाजवीणाऱ्या बाजीरावांना एका समाजाच्या चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक असल्याचेही खर्डेकर म्हणाले. आंनद दवे यांनी ब्राह्मण महासंघाच्या कार्याची माहिती दिली. तसेच यापुढील काळात ब्राह्मण महासंघ ब्राह्मण समाज भूषण असणाऱ्या सर्व महापुरुषांच्या स्मृती जतन करेल व ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षांसाठी सर्वतोपरी कार्य करेल असे ही ते म्हणाले.यावेळी वचनपूर्ती केल्याबद्दल मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...