एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपती पुतळ्यासमोर दीपोत्सव

Date:

पुणे-तुतारीची ललकारी… सनई चौघड्याचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक पुतळ्यासोबतच सरदार कान्होजी जेधे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासोबतच सरसेनापती वीरबाजी पासलकर, मानाचे पहिले पान सरदार कान्हेजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे या घराण्यांच्या प्रतिनिधींचा स्वराज्य रथ सोहळ्यामध्ये ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल  जिरेटोप देऊन गौरव करण्यात आला.

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणेमहापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मंगोलीया येथे शरीरसौष्ठव स्पर्धेत मीस्टर वर्ल्ड किताब विजेते महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. शिवरायांचरणी ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. यंदा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात प्रथमच सहभागी झालेल्या गरुड, घारे, काटे, निंबाळकर, संत तुकाराम महाराज भक्तीशक्ती, महाडीक आणि कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीनाथ भिमाले म्हणाले की, पुण्यात साज-या होणा-या दीपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दीपोत्सव पुणेकरांच्या ह्रदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा होतो. हा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या ऐतिहासिक पुतळ्याने ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुतळयाचे वजन ८ हजार किलो आहे. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली  . कार्यक्रमाचे नियोजन रवींद्र कंक, सचिन पायगुडे, गिरीश गायकवाड, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, निलेश जेधे, अनिल पवार, किरण देसाई, राजाभाऊ ढमढेरे, गोपी पवार, मयुरेश दळवी, किरण कंक, निलेश जगताप, युवराज शिंदे, सुशांत साबळे, सुभाष सरपाले आदींनी  केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...