यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातली 89.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही मुलीचं उत्तीर्ण होण्याचं मुलांपेक्षा जास्त आहे. दहावीला बसलेल्या 91.42 टक्के मुली पास झाल्यात. तर राज्यातली 87.98 टक्के मुलं पास झाली आहेत.
सर्वाधिक निकाल नेहमीप्रमाणेच कोकण विभागाचा लागलाय. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 97 टक्के निकाल लागलाय. यंदा दुष्काळानं होरपळणाऱ्या लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 81.54 टक्के लागलाय. विशेष म्हणजे एका किंवा दोन विषयात नापास झालेल्यांची संख्या 79 हजार 560 असून त्यांनाही 11 वीत प्रवेश मिळणार आहे.
येत्या 18 जुलैला 10वीची फेर परीक्षा घेण्यात येणार असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलंय. दुपारी 1 विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
विभागानिहाय निकाल
कोकण – ९६.५६ टक्के
पुणे- ९३.३० टक्के
नागपूर – ८५.३४ टक्के
औरंगाबाद – ८८.०५ टक्के
मुंबई – ९१.९० टक्के
कोल्हापूर – ९३.८९ टक्के
अमरावती – ८४.९९ टक्के
नाशिक – ८९.६१ टक्के
लातूर – ८१.५४ टक्के
एकूण परिक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी – १६ लाख ७ हजार ४११
एकूण विद्यर्थ्यांनी परिक्षा दिली – १६ लाख १ हजार ४०६
उत्तीर्ण झालेली विद्यार्थी संख्या – १४ लाख ३४ हजार १४३
मुले – ८७.९८ टक्के
मुली – ९१.४२ टक्के