पुणे- महिलांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून अय्यप्पा देव कोपला आणि म्हणून हा प्रलय आलाय असे वक्तव्य करून महिलांची कुचेष्टा करणाऱ्या संघ-वादी गुरुमूर्थीची रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदा वरून हकालपट्टी करा अशी मागणी आदिम हिंदू महासंघाने केली आहे अशी माहिती या संघाचे समन्वयक संजय सोनवणी यांनी येथे दिली.
ते म्हणाले ,’केरळ मध्ये आलेल्या पुरा मुळे प्रचंड नुकसान झालेले आहे, नागरिकांची दैना प्रचंड वेदनादायक आहे. केरळ आपल्या पायावर उभे राहण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे, संपूर्ण देश केरळ वासीयांच्या पाठीशी उभा आहे. परंतु अश्या स्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि रिजर्व बँकेचे संचालक गुरुमूर्थी यांनी या पुराचा संबंध शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश याशी जोडला आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून अय्यप्पा देव कोपला आणि म्हणून हा प्रलय आलाय असे विचित्र, विक्षिप्त, विषमता वादी वक्तव्य गुरुमुर्थीनी केले आहे. आदिम हिंदू महासंघ या असंवेदनशील, विषमतावादी विचारांच्या गुरुमूर्थीचा निषेध करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे महिलांच्या बाबतीत नेहमीच दुय्यम दर्जाचे राहिलेले आहे आणि हे त्याचेच उदाहरण आहे. हे विचार वैदिक धर्मातून आलेले असून सर्वसामान्य हिंदू समाज याच्या विरोधात आहे. नैसर्गीक विपदेच्यावेळी असे असंवेदनशील आणि अमानवी वक्तव्य करणाऱ्या गुरुमूर्थींची रिझर्व्ह बँकेच्या पदा वरून हकालपट्टी करावी अशी मागणी आदिम हिंदू महासंघ करीत आहे.

