आंदोलनानंतरही नाही आली जाग .. पण रिपब्लिकन शहराध्यक्षांचा ९ जागा मिळाल्याचा दावा आंदोलकांनी फेटाळला

Date:

पुणे : भाजपा कार्यालयासमोर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करूनही भाजपा नेत्यांना आणि त्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांना जाग आली नसून एकीकडे शहर अध्यक्ष आणि प्रदेश सचिव यांनी पुण्यात ९ जागा मिळाल्याचा दावा केला आहे तर आंदोलकांनी तो खोडून काढला आहे. मंदार जोशी म्हणाले या ९ मध्ये अवघे ३ च रिपब्लिकन उमेदवार आहेत. बाकी ६ उमेदवारांचा रिपब्लिकन म्हणून अजिबात संबध नाही .

दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.प्रभाग क्रमांक १ मध्ये अश्विनी राहुल भंडारे, प्रभाग २ अ – रेणुका चलवादी, प्रभाग २ ब – सुधीर वाघमोडे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवतकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून मृणाली बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे.

पुढे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप – आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तर आंदोलकांनी मात्र परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे हे तीनच रिपब्लिकन उमेदवार असल्याचे म्हटले आहे. इतर भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. जे रिपब्लिकन च्या नावाने घुसविले गेले आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....