Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्रीदेवी ! हवा हव्वाई…!!

Date:

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दाक्षिणात्य अभिनेत्रींची फार मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेत दर दशकाला एक नव्या दाक्षिणात्य तारकांची भर पडत गेल्याचे दिसून येईल.अगदी खूप मागे जरी गेलो तरी यात फरक आढळून येत नाही. आणि त्यातही विशेष म्हणजे दाक्षिणात्य नायकांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या अंगीभूत गुणांच्या व अप्रतिम दाक्षिणात्य अभिजात सौंदर्याच्या, नृत्यकौशल्याच्या बळावर आघाडीच्या सिनेतारका बनलेल्या दिसून येतात. दाक्षिणात्य नायक मात्र तुलनेने अपवाद स्वरुपातच हिंदी सिनेमात व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरल्याचे दिसून येईल. अगदी कमल हसन, रजनीकांत शिवाजी गणेशन सारख्या दक्षिणेकडील महानायकांनाही हिंदी सिनेमात अत्यंत मर्यादित यश मिळाल्याचे दिसून येईल. या उलट दाक्षिणात्य नायिका मात्र त्यांच्या शामल वर्णी सौंदर्य व नृत्यनिपुणतेच्या जोरावर पदार्पणातच हिंदी पडदा काबीज करण्यात नंबर वन ठरल्या आहेत. मग ती वैजयंतीमाला असेल, हेमामालिनी असेल, रेखा असेल अगर पद्मिनी, रागिणी, त्रावणकोर भगिनी वा जयप्रदा, बी सरोजादेवी, जमुना, असेल. या दाक्षिणात्य नायिकांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी सिनेमात नायिका म्हणून पदार्पण केलेल्या श्रीदेवीनेही आपल्या पदार्पणातील 1978च्या ’सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे जाणकार, अभ्यासू रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी श्रीदेवीने 1975 साली ’ज्य्ाुली-’ चित्रपटात लक्ष्मी (ज्य्ाुली)च्या धाकट्या बहिणीच्या रुपात बालकलाकार म्हणून हिंदी सिनेरसिकांना आपली निसटती झलक दाखवली होती. ज्य्ाुलीनंतर या चित्रपटाच्या नायक-नायिका अल्पावधीतच विस्मृतीच्या धुक्यात दिसेनाशा झाल्या.

पण 1975 मध्ये बालकलाकार म्हणून हिंदी सिनेमात आलेल्या त्याच श्रीदेवीचा 1978चा ’सोलवा सावन’ हाच नायिका म्हणून पदार्पणातील पहिलाच यशस्वी, दखलपात्र सिनेमा समजायला हवा.

हा चित्रपट कमल हसन पेक्षा श्रीदेवीच्या आगळ्यावेगळ्या अशा अभिव्यक्तीने रसिकांना मनापासून आवडला. तिची ’सोलवा सावन वा सदमा’ या चित्रपटातील देहबोली, अभिव्यक्ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेली.

श्रीेदेवी ने हिंदी सिनेमात पदार्पण केले ते ऐंशी (1980) चे दशक तेंव्हा रेखा, हेमा मालिनी आपल्या अभिनय कौशल्याने गाजवत होत्या. शर्मिला टागोर, मुमताज, राखी, झिनत अमान, सारख्या बिगरदाक्षिणात्य नायिकांना हेमा मालिनी व रेखा भारी पडत होत्या. थोडक्यात ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य नायिका हिंदी सिनेमा रुपेरी पडदा गाजवत असतानाच श्रीदेवीचे ’सोलवा सावन’ आणि ’सदमा’ सारख्या चित्रपटाव्दारे नायिका म्हणून झालेले आगमन अनेकांना ’चमकवून’ गेले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले कर्तृत्व यथोचित सिध्द केलेली श्री देवी जेव्हा हिंदी सिनेमात आपले नशिब आजमावण्यासाठी आली तेव्हा हिंदी सिनेसृष्टीतील अनेकांच्या उंचावल्या.

हेमा मालिनी, रेखा, शर्मिला, मुमताज, मालासिन्हा, आशा पारेख, वहिदा रेहमान सारख्या बड्या बड्या आघाडीच्या नायिकांसमोर या चिमुरड्या आवाजाच्या श्रीदेवीची डाळ शिजणार का असाच प्रश्न बहुतेकांच्या मनात तेव्हा होता.

श्रीदेवीचा नायिका म्हणून दक्षिणेकडील विजय अनेकांना तोपर्यंत अपरिचितच होता. पण अनेकांना ठाऊक नव्हते की श्रीदेवी तेव्हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची लोकप्रिय, यशस्वी नायिका होती.

श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये शिवकाशीला अय्यपन घराण्यात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती बालकलाकार म्हणून दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होती. ’थुनाआवन’ या पहिल्या चित्रपटात तिने 1967ला राजा मुरुगाची भूमिका केली होती. त्यानंतर तिने तामिळ, तेलगू अशा अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून आपला ठसा उमटवला. ज्यात 1971 च्या ’पुम्पट्टा’ चित्रपटासाठी तिला केरळ राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. कंदन करुनाई, प्रार्थनाई, नामनाडू, वसंत मालिगई, बाबु, हे तिचे बालकलाकार म्हणून उल्लेखनीय चित्रपट होत. असो. दाक्षिणात्य चित्रपटात श्रीदेवीची नायिका म्हणून फर्स्ट ईनिंग 1976 मधील  ’मून्द्रू मुडीचू’या तामिळ चित्रपटाव्दारे झाली. या काळात तिने दक्षिणेकडील कमल हसन, रजनीकांत सारख्या बड्या आघाडीच्या नायकांबरोबरही काही चित्रपट केले.

हिंदी सिनेमात चमकण्यापूर्वी 1976 ते  1979 या काळात तिने …”16-वयथिनईल, ’पदाहरील्ला,’ सिंगाप्पुरोजक्कल,’एस.पी.मुथ्थुरमनस प्रिया, ’कार्तिकदिपम,’जॉनी,’ अकाली राज्यम,..इत्यादि. अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. 1981 आणि 1982 मध्ये तिला अनुमे ”मीन्दम कोकिला” आणि ”मून्द्रम पिराआ” या तामिळ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरचा  (तामिळ विभागात) आणि तामिळनाडू राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, हिंदी सिनेमात त्यावेळी ती अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असतानाच तिला हे दाक्षिणात्य चित्रपटांसाठीचे पुरस्कार मिळाले होते. श्रीदेवी एकाच वेळी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिकेत चौफेर कर्तृत्व गाजवणारी एकमेव कलाकार असावी. कारण निदान त्यावेळी तरी दोन्हीकडे आघाडीची नायिका म्हणून ती वाटचाल करत होती. हा तिचा दोन्ही कडील करियर ग्राफ विस्मयचकित करणारच म्हणावा लागेल. कारण 1992 मध्ये हिंदीत ती सुपरस्टार असतानाच तिने ’क्षण-क्षणम’ या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित तेलगु चित्रपटात साकारलेल्या अविस्मरणीय भिूमकेसाठी तिला फिल्मफेअरचा अन् आंध्र राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार एकाच वर्षी  मिळाला. तिचे ”कोंण्डा वीटम सिंहम, सरदार पापाराय्ाुदी, बोबिली, पुली, प्रेमाभिषेकम, गोविंदा-गोविंदा, एस.पी. परसुराम, कलावरी संसारम, प्रेमाकनुका, बंगारुकनुका, इत्यादी श्रीदेवीचे उल्लेखनीय गाजलेले  तेलगू चित्रपट समजले जातात.

एकाच वेळी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अप्रतिम नृत्यनैपुण्य, व चित्तवेधक देहबोलीने दोन्हीकडील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्‍या श्रीदेवीची चौफेर फलंदाजी दखल घ्यावी अशीच आहे.

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर श्रीदेवीचे सुरवातीचे सोलवा सावन काय किंवा सदमा काय हे जणू तिचे हिंदी सिनेमातील आगामी कार्यकर्तृत्वाचे ट्रेलर होते. कारण त्यानंतर 1983 पर्यंत ती मुंबापुरीतून जणू गायबच झाली होती. या दोन्ही सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवीला स्वत:मधील उणिवा जाणवल्या. भाषेचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय आपण इथे टॉपला जाऊ शकत नाही हे तिने ओळखले. सोलवा सावन व सदमाच्या वेळेस तिला मातृभाषेशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती. बंबय्या हिंदी, बंगाली किंवा पंजाबी बोलणं तिच्या डोक्यावरुन जाई.दाक्षिणात्य भाषेमुळे आपसात संवाद घडत नसे. तेव्हा त्यावर मात केल्याशिवाय आपली बॉलीवूडमध्ये डाळ शिजणार नाही हे ओळखून तिने परत आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला.

पण याच काळात जितेंद्रने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला. दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेक चित्रपटांच्या ऑफर स्विकारु लागला. अन् हिंदी सिनेमा पूर्ण तयारनिशी काबीज करण्यासाठी दाक्षिणात्य निर्मातेही श्रीदेवी (नंतर जयाप्रदा,तब्बु,इ तारकांना घेऊन)गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा (डंबिंग न करता) हिंदी रिमेक बनवू लागले. अशा प्रकारे श्रीदेवी अन् जिंतेंद्र ही जोडी दक्षिणेकडील चित्रपटांच्या रिमेकमध्ये गाजू लागली. (अल्पावधीतच श्रीदेवीच्या जोडीला जितेंद्रला जयप्रदा ही नायिकाही ’लाभली’.)

हिम्मतवाला या पहिल्याच चित्रपटाने श्रीदेवी-जितेंद्र जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली. अन् याच चित्रपटापासून श्रीदेवी गाजू लागली.

1983 मध्ये आलेल्या जितेंद्र समावेतच्या ’हिम्मतवाला’ने सर्वत्र एकच धुमाकूळ घातला. संपूर्ण दाक्षिणात्य सेटअपमध्ये बनलेला पुर्णपणे दाक्षिणात्य वळणाच्या हिम्मतवालामध्ये तिचा नायक जितेंद्र तेवढा मुंबईचा होता. शक्तीकपूर, अमजदखान, ही जोडगोळी आणि दाक्षिणात्य वळणाची भडक, बटबटीत पटकथा असलेला दक्षिण भारतातील हिरवागार निसर्ग टिपणारा हिम्मतवालाने एक वेगळाच ट्रेण्ड हिंदी फिल्म इंडस्ट्रीत रुढ केला. भप्पी लहरीचे संगीतही जितेंद्रला साथ देऊ लागले. हिम्मतवालाच्या पावलावर पाऊल टाकत श्रीदेवीचे मवाली, मकसद, जस्टीस चोैधरी चित्रपटांनी अल्पावधीतच श्रीदेवी-जितेंद्र जोडीला सुपरहिट पेअरचा दर्जा मिळाला. त्यावर कळस चढवला 1984च्या ’तोहफा’ने. जयाप्रदा श्रीदेवी अन् जितेंद्र हा जणू रुपेरी पडद्यावरील लोगोच ठरला. या चित्रपटाने त्यावर्षी लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. या जोडीच्या संगीत आणि नृत्यगीतांची पंचपक्वानांची मेजवानी असलेल्या तोहफा सारख्या चित्रपटांची नंतर रांगच लागली.

श्रीदेवी-जितेंद्र या जोडीने एकूण 16 चित्रपटात एकत्र काम केले ज्यापैकी 11 चित्रपट सुपरहिट ठरले. श्रीदेवी काय किंवा जितेंद्र काय या दोघांनीही नृत्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नसूनही या जोडीची मवाली, हिम्मतवाला, तोहफा, मकसद आदि चित्रपटातील पदन्यास,नृत्यातील उस्फूर्तता जाणकारांनाही चकित करुन गेली.

हिंदीत आतापर्यंत आलेेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या पार्श्वभूमीवर श्रीदेवीचे जाणवणारे सर्वात महत्वाचे ठळक वैशिष्ठये म्हणजे श्रीदेवी तिच्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रसृष्टीत त्याकाळातील सुरवातीपासून अखेरपर्यंत दोन्हीकडे सर्वाधिक व्यस्त तारका होती. हिंदीत नाव कमावले म्हणून तिने दाक्षिणात्य चित्रसृष्टीकडे अजिबात दुर्लक्ष केलेले आढळत नाही. दोन्हीकडे एकाच वेळी तिला मुबलक ऑफर येत होत्या. अन् ती दोन्हीकडील चित्रपटांना समान न्याय देत होती. त्यामुळे ती दोन्हीकडे सर्वाधिक लोकप्रिय सुपरसम्राज्ञी होती. दक्षिणेकडे तिच्या चाहत्यांनी तिची पूजा बांधली तर नवल नाही कारण तिकडे  सितार्‍यांची व्यक्तीपूजा आम बात आहे. पण बंबय्या सिनेमाच्या गल्लोगलीतील  तिच्या चाहत्या तरुणी स्वत:ला श्रीदेवी समजू लागल्या यातच काय ते समजा. तिची वेषभूषा (विशेषत: चांदनी फेम) तिची केशभूषा नावाजली जाऊ लागली.

याच दरम्यान हिंदी सिनेमात इच्छाधारी नागिणीच्या सूडकथा पकड घेऊ लागल्या होत्या. नगिना या चित्रपटातील श्रीदेवीची इच्छाधारी नागिण अनेकांना घायाळ करुन गेली. नगिना हा त्यावर्षीचा सर्वाधिक सुपरडुपरहिट चित्रपट जाहिर झाला तो केवळ श्रीदेवीच्या नृत्यकौशल्याने. या चित्रपटातील तिचे वादातीत नृत्यकौशल्य अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेले. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत होऊन गेलेल्या सर्वाधिक गाजलेल्या सर्पचित्रपटात नगिनाचा बराच वरचा क्रमांक लागतो. त्याचे श्रेय केवळ श्रीेदेवी अन् अमरीश पुरी यांनाच द्यावे लागेल. जानबांज आणि कर्मा हे श्रीदेवीचे याच काळातील चित्रपट होत.

शेखर कपूरचा ’मिस्टर इंडिया’ श्रीदेवीचा महत्वाचा गाजलेला चित्रपट. यात तिने चार्लीचॅपलिनची केलेली नक्कलही दाद देऊन गेली. अन् यातील अनिल कपूर श्रीदेवी आणि बच्चे लोकांवर चित्रित ’पॅरिडी साँग’ ही भलतेच सुपरहिट ठरले. अर्थात सगळयात जास्त भाव घेऊन गेला तो अमरिश पुरीचा ’मोगॅम्बो’…

असाच श्रीदेवीचा डबल रोल असलेला गाजलेला चित्रपट म्हणजे पंकज परशर दिग्दर्शित ’चालबाज’.. यातील तिने सिता और गीता मधील हेमामालिनीची कॉपी न करता दखलपात्र अभिनय केला. यातीलही सर्व गाणी सुपरहिट ठरली. ज्यात मिस्टर इंडिया मधील ”हवा हव्वाई’…आणि ”कांटे ना कटे..” ने तर कहरच केला. चालबाज या चित्रपटातील तिचे गाजलेले वर्षानृत्यगीत…” ना जाने कहाँ से आयी है..’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी तिच्या अंगात 103 डिग्रीपर्यन्त ताप असूनही तिने ते गाणे अशा झोकात केले की आजही त्या नृत्यगीताचे कौतुक होते.

चालबाज, मिस्टर इंडिया या चित्रपटांच्या यशामुळे तिने तत्कालीन तिच्या स्पर्धक जयाप्रदा अन् मिनाक्षी शेषाद्रि यांना तिने केव्हाच मागे टाकले. सनी देवल अन् रजनीकांत सारख्या आघाडीच्या नायकांनाही तिने आपल्या आकर्षक सादरीकरण, आणि कॉमिक रोलमुळे निष्प्रभ करुन टाकले.

चालबाज प्रमाणेच श्रीदेवीचा आणखी एक ब्लॉकबस्टर म्हणजे ”चांदनी’. यश चोप्रांच्या चांदनीच्या उदंड अमाप व्यावसायिक यशाने जणू श्रीदेवीच्या कारकिर्दीत चारचांद लागले. चालबाज आणि चांदनी मधील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे 1989चे नॉमिनेशन मिळाले तर चांदनी चित्रपटाला त्यावर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटाचा नॅशनल फिल्मअ‍ॅवॉर्ड जाहिर झाला. या चित्रपटातील -’मेरे हांथोमे नौ नौ चुडियां हेै..” या गाण्याने तर त्यावर्षी अक्षरश: कहर केला. तरुणींनी हातात हातभर रंगीबेरंगी बांगड्या घालण्याच्या नव्या फॅशनने नव्या संस्कृतीला जन्म दिला.

यश चोप्रा यांचा लम्हे हा चांदनी नंतरचा श्रीदेवीचा तिकिटाच्या बारीवर फसलेला पण चित्रपटसमिक्षक व जाणकारांनी नावाजलेला क्लासिक चित्रपट होय. यातील श्रीदेवीचा आई व मुलीचा (पल्लवी आणि पूजाचा) डबलरोल अविस्मरणीयच. या चित्रपटाला फिल्मफेअरचे पाच पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा श्रीदेवीचा पुरस्कारही सामील आहे. पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी अव्हेरलेला एक अतिशय धाडसी विषय असेच त्याचे वर्णन योग्य ठरेल. अनिल कपूर अन् श्रीदेवीचा एक सर्वस्वी वेगळ्या मॅच्य्ाुरड भूमिका असलेला ‘लम्हे’ यश चोप्राच्या कारकिर्दीतील एक क्लासिकच होता.

यानंतर चा अमिताभ बच्चनचा ’खुदागवाह’ वेगळया अफगाणीस्तान, (नेपाळ) काबुलच्या संमिश्र पार्श्वभूमीवरील चित्रपटातही श्रीदेवीच्या सर्वस्वी दोन रुपे (बेनझिर आणि मेहंदी) प्रेक्षकांना चकित करुन गेली. डबल रोल करणे हा त्या काळातील कलाकारांचा प्रेस्टिज इश्य्ाू असे.श्रीदेवीने डबलरोल केले तरीही त्यात वैविध्य होते. एकसाची डबलरोल नव्हते.

श्रीदेवीच्या प्रत्येक हिंदी सिनेमाचा संपूर्ण विश्लेषणात्मक आढावा घेणे जागे अभावी शक्य नाही.परंतु त्यातल्या त्यात महत्वाच्या चित्रपटांचा येथे केवळ नामोलेखही पुरेसा आहे. त्यादृष्टीने श्रीदेवीचे गाजलेले आणि क्लासिक निवडक चित्रपट म्हणजे… सोलवा सावन, सदमा, लम्हे, खुदागवाह, जुदाई, हिम्मतवाला, तोहफा, मकसद, वक्त की आवाज, जस्टीस चौधरी, नगिना, मिस्टर इंडिया, चांदनी, चालबाज, लाडला, इंग्लिश-विंग्लीश.

बॉनी कपूरशी लग्न झाल्यानंतर 1997 साली आलेला ”जुदाई” हा श्रीदेवीच्या पहिल्या इनिंगमधील शेवटचा सुपरहिट फॅमिली ड्रामा होय. ज्यातील तिची पैशासाठी वाटेल त्या टोकाला जाणार्‍या पत्नीची भूमिका तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नॉमिनेशन देऊन गेली. प्रेक्षकप्रिय अशा या ’जुदाई’ नंतर श्रीदेवीने रुपेरी पडद्यापासून जी फारकत घेतली ती पंधरा वर्षाच्या ”बड्या ब्रेक नंतर’ एकदम 2012 मध्येच तीने ’इंग्लिश-विंग्लीश’ द्वारा पुनरागमन केले. तिचा हा दुसर्‍या फेरीतील ’इंग्लिश-विंग्लीश’ तिला अमाप यश, अफाट कौतुक आणि भरघोस वेलकम विश देऊन गेला. यातील तिची भूमिका वेगळ्या धाटणीची अन् जबरदस्त आव्हानात्मक असूनही तिने ती भूमिका ज्या सहजतेने साकारली अन् आधुनिक एकविसाव्या शतकातील समर्थ स्त्री-शक्तीचे आत्मविश्वासाचे अभिनयातून दर्शन घडवले त्यामुळे समस्त रसिक (विशेषत: महिलावर्ग) तिच्यावर अक्षरश: लट्टू  झालेे. मातृभाषेशिवाय अन्य अत्याधुनिक, विचारसरणी वा राहणीमानाचा वाराही न लागलेली गृहिणी एकविसाव्या शतकातील स्वतंत्र प्रगत विचाराची, इंग्रजी भाषेवर प्रयत्नपूर्वक हुकमत मिळवणारी नायिका चित्रपटसमिक्षक, जाणकारासह सर्वसामान्य प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.

दरम्यानच्या तिने काही वाहिन्यांवरील काही कार्यक्रमातूनही दर्शन दिले, जसे की, ’मालिनी अय्यर’, ‘जिना इसिका नाम है’ इ.इ.

या चित्रपटाआधी 2008 पासून  2013 पर्यंत तिने फॅशन विश्व आपल्या अफलातून सौंदर्य आविष्काराने आकर्षक वेषभूषेमुळे संमोहित केलेले होते.

“इंग्लिश-विंग्लीश”च्या मुहतोड लाजबाब यशानंतरा तिने आपल्या ’मॉम’ चित्रपटातून आपल्या तरुण पिढीला म्हणजे थोरली मुलगी जान्हवीला प्रेक्षकपसंतीसाठी पेश केले.

आजही तिची ओळख तिच्या अभिजात, अफलातून नृत्यातूनच होत होती. तो तिचा बालेकिल्लाच म्हणायला हवा. नृत्य आणि अभिनय  जिच्या रोमारोमात भिनला आहे त्या श्रीदेवीने बॉलिवूडवर आपल्या कर्तृत्वाची जी अवीट मोहोर उठवली आहे. ती पुसणे अशक्य आहे. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुबईत तिचे आकस्मात निधन झाले. त्याचे दुःख पती बोनी, कन्या जान्हवी व खुशी यांच्या प्रमाणेच सार्‍या चित्रपट रसिकांना झाले, तिची एक्झीट जीवाला चटका लावून गेली.

वाळिंबे वृत्तसेवा, पुणे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...