पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे ‘एक पणती शहिदांसाठी’ विशेष उपक्रम

Date:


पुणे – गेली अनेक वर्षे भारतीय सैनिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे करण्यात येते  पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व कार्यक्रमाचे आयोजक आबा बागुल म्हणाले की, ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, आपल्या कुटुंबापासून दूर राहून सर्व सामन्यांना जगता यावे यासाठी सीमेवर खडा पहारा देणारे सैनिक सीमेवर आतंकवादी कारवाया रोखताना शाहिद होतात अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी पाडवा दिनी ‘एक पणती शाहिदांसाठी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवदर्शन चौकात शेकडो पणत्या प्रज्वलित करून दिवाळीनिमित्त शहिदांचे  स्मरण करण्यात आले. गेल्या 10 वर्षापासून शाहिद भारतीय सैनिक व शाहिद पोलीस बांधवांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आजच्या पिढीला करून देण्यासाठी व देशप्रेम सैदैव त्यांच्यात तेवत ठेवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते असे आबा बागुल म्हणाले.

पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी पॅराप्याजिकल सेंटर मधील आर्मीचे सैनिक सहा वेळा बॅडमिंटन व्हीलचेअर स्पर्धेत नॅशनल जिंकणारे मा.सुरेश कारकी यांच्या हस्ते पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवदर्शन चौक येथे रांगोळी काढून, स्पीकरवर देशभक्तीपर गीते व  शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. रस्त्यावरून जाणारे नागरिक हे सर्व पाहून मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. सर्व परिसर देशभक्तीच्या वातावरणात नाहून निघाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण इंदलकर उपस्थित होते त्याच बरोबर पुणे नवरात्रौ  महोत्सवाचे पदाधिकारी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी,ऍड चंद्रशेखर पिंगळे, सागर आरोळे,सागर बागूल महेश ढवळे , अभिषेक बागुल,इम्तियाज तांबोळी,सुरेश गायकवाड,गणेश खंडारे,बाबासाहेब पोळके,संतोष पवार, गौरव साळवे, सुनील लोखंडे, गोरख मरळ, राहुल तौर,राहुल शिंदे,रवी मोरे, इर्शाद शेख, उमाकांत गायकवाड, तुषार पवार,अक्षय सातपुते,यश कट्टीमनी,अजय ढावरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

अमित बागुल म्हणाले की, 17 वर्ष व्हीलचेअरवर असून देखील देशासाठी मेडल जिकण्याच्या सुरेश कारकी यांच्या जिद्दीला सलाम असून भावी पिढीला सैनिक व पोलिसांच्या बलिदानाचे स्मरण होऊन जागरूक नागरिक तयार होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सदस्य सागर आरोळे यांनी आभार मानले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मनसे शिवसेना युती,माविआत नाही,पण पुण्यात बैठकीला शिवसेना नेते,कार्यकर्ते कनफ्युज…

पुणे- मनसे आणि शिवसेना युती झाली,दोन्ही ठाकरे बंधू एकत्र...

आयसीआयसीआय बँकेची पुण्यात कॉर्पोरेट इकोसिस्टम शाखा

·         येथे 24x7 एटीएम सुविधेची सोय आहे. ·         कॉर्पोरेट इकोसिस्टीमसाठी बँकिंग सेवांची विस्तृत श्रेणी...