पुणे : लाखो चाहत्यांचा ‘दिल की धडकन’ असलेला, बहुपैलू गायक सोनू निगम तब्बल पाच वर्षांनंतर पुण्यात ‘क्लोज टु हार्ट’ ही आपली संगीत मैफिल सादर सादर करणार आहे. हा कार्यक्रम येत्या २४ फेब्रुवारीला, महाशिवरात्री दिवशी सायंकाळी सहानंतर मगरपट्टा सिटीतील लॉन क्र. ३ वर होणार असून त्याचे आयोजन आघाडीचा ऑनलाईन इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्स ब्रँड ‘बॅशडॅडी’तर्फे करण्यात आले आहे. सोनूच्या बहुचर्चित सिंफनी ऑर्केस्ट्रासह सादर होणारी त्याची ही पुण्यातील पहिलीच जाहीर मैफिल आहे. गेले दशकभर संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आपली लोकप्रिय गाणी सोनू या मैफिलीत सादर करणार आहे.
‘क्लोज टु माय हार्ट’ या मैफिली गेल्या दोन वर्षांपासून जगभरच्या रसिकांना चित्तवृत्ती बहरुन टाकणारा श्रवणानंद मिळवून देत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका व संयुक्त अरब अमिरातीतही (युएई) या मैफिलींनी श्रोत्यांची मने जिंकली आहेत. सर्वांत मोठ्या बॉलिवूड संगीत कार्यक्रमांपैकी असलेली ही तीन तासांची मैफिल म्हणजे पुणेकर रसिकांना निश्चितच मंत्रमुग्ध करुन टाकणारा अनुभव ठरेल.
www.bashdaddy.com, www.bookmyshow.com, www.paytm.com तसेच अन्य मोजक्या ऑनलाईन तिकीटविक्री कंपन्यांकडे या कार्यक्रमाची तिकीटे उपलब्ध आहेत. ऑफलाईन पद्धतीनेही ती उपलब्ध आहेत. अधिक तपशिलासाठी दूरध्वनी : ८८० ६७० ३०००