महाराष्ट्रात सोनाटा अनव्हेल २.० लॉन्च

Date:

पुणे, 15 डिसेंबर, २०२२: भारतातील सर्वाधिक विक्री नोंदवणारा घड्याळांचा ब्रँड, टायटन कंपनी लिमिटेडच्या सोनाटाने महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यवसाय विस्ताराची घोडदौड कायम राखली आहे.  सोनाटासाठी पाच सर्वाधिक महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये उत्तमोत्तम उत्पादने सादर करून हा ब्रँड आपले स्थान सातत्याने मजबूत करत आहे. आता सोनाटा पुरुष व महिलांसाठी बनवलेले आपले सर्वात नवे कलेक्शन अनव्हेल २.० लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

सोनाटा अनव्हेल २.० कलेक्शनस्केलेटल क्वार्ट्झ घड्याळामध्ये आकर्षक डिझाईन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. २००० ते ३००० रुपयांदरम्यान किमतीची ही घड्याळांची नवी श्रेणी ब्रँड पोर्टफोलिओमध्ये दाखल होत आहे. या कलेक्शनमध्ये अनोखी डिझाईन्स आहेत जी युवा ग्राहकांना खूपच आवडतील. पुरुष आणि स्त्रिया प्रत्येकासाठी अनव्हेलमध्ये १० पेक्षा जास्त डिझाईन्स असून स्पेशल लुक आणि प्रीमियम स्टाईलची ही घड्याळे तुमचा प्रत्येक क्षण खास बनवतील. यातील प्रत्येक घड्याळ आधुनिक आहेत्यापाठीमागच्या संकल्पना अतिशय अनोख्या आहेत. सर्व प्रसंग आणि सणासुदीसाठी ही घड्याळे अतिशय साजेशी आहेत. विविध रंगांच्या आकर्षक केसेस आणि डायल्सउत्तम दर्जाच्या लेदरचा किंवा स्टेनलेस स्टील स्ट्रॅप्सचा वापर यामुळे सोनाटा अनव्हेल २.० घड्याळांचा लुक अतिशय प्रीमियम झाला आहे. 

टायटन कंपनी लिमिटेडमध्ये एसएफ आणि सोनाटाचे मार्केटिंग हेड श्री. सुबिश सुधाकरन म्हणालेसोनाटा घड्याळांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने नेहमीच खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या अनेक वर्षात सोनाटाने एक ब्रँड म्हणून प्रभावी ओळख निर्माण केली आहे आणि अनव्हेल २.० सारखी उत्पादने सादर करून आम्ही अशा खूप मोठ्या ग्राहकसंख्येला आकर्षित करू इच्छित आहोत जे फॅशनविषयी चोखंदळ आहेत. महाराष्ट्रातील बाजारपेठेला आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत आणि नवीन कलेक्शनसह परवडण्याजोग्या किमतींना आम्ही व्यवसाय विस्तार करत राहू. हेच आमच्या ब्रँडचे उद्दिष्ट आहे.”

घड्याळांच्या असंघटित बाजारपेठेमधून अपग्रेड करूनउत्तम गुणवत्तेच्या वचनासह ग्राहकांना उत्तम मूल्य असलेले उत्पादन उपलब्ध करवून देण्याची संधी असल्याचे ब्रँडने जाणले. महानगरे आणि मध्यम श्रेणीतील शहरांमधील नवीन ग्राहकवर्गाला आकर्षित करून व्यवसाय विस्तार करण्याची सोनाटाची योजना आहे. सर्वसामान्य व्यक्तीचा सर्वसामान्य ब्रँड इथपासून ते युवकांना प्रेरणा देणारा ब्रँड असा यशस्वी पल्ला या ब्रँडने पार केला आहे. सकारात्मकसार्थक आणि प्रभावी कम्युनिकेशन्स निर्माण करणे ही सोनाटाच्या प्रत्येक कॅम्पेनची मूलभूत संकल्पना असते. नुकतेच या ब्रँडने आपली नवी कॅम्पेन फिल्म युअर स्टाईल दॅट शाईन्स नुकतीच लॉन्च केली आहेज्यामध्ये प्रशंसेची अतुलनीय शक्ती दर्शवण्यात आली आहे.

सोनाटामध्ये प्रत्येकासाठी आणि प्रत्येक प्रसंगासाठी घड्याळे आहेत – पुरुषस्त्रिया आणि तरुणांसाठी फॅशनस्पोर्टीफॉर्मलड्रेसट्रॅडिशनल अशा विविध प्रकारची घड्याळे आहेत. युवकांसाठी परवडणाऱ्या किमतींच्यासहज वापरता येतील अशास्टायलिश घड्याळांच्या वैविध्यपूर्ण कलेक्शनमध्ये एसएफ बाय सोनाटा देखील दाखल करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सोनाटा ब्रँड दरवर्षी तब्बल ५.५ मिलियन घड्याळांची विक्री नोंदवतो.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मविआला झुलवत तुतारी मिळाली अखेर घड्याळाला?

चर्चा, उत्सुकता,गोंधळ आणि शेवटी सारे काही सत्तेच्या बाकावर बसण्यासाठी,विरोधात...

भाजप: बंडखोरी रोखण्यासाठी यादी नाही,थेट फोन करून देणार AB फॉर्म

पुणे :भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव...

भाजपा कार्यालयासमोर दलीत, रिपब्लिकन कार्यकर्ते करणार निदर्शने

पुणे: भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून उमेदवारी देताना दलीत आणि मागासवर्गीय,...

भाजपाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन

पुणे, दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार...