पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील संगीत दालनाचे उद्घाटन समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा शामाताई घोणसे व शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
संगीताला भाषा नसते. संगीतामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आनंद, समाधान व उत्साह निर्माण होतो. विद्यार्थ्यांवर संगीताचा संस्कार व्हावा या उद्देशाने संगीत दालनाची निर्मिती करण्यात आली.
सिध्दी कराडकर या विद्यार्थीनीने भारू, तनय नाझीरकर याने गवळण, अनन्या गोवंडे हिने भावगीत सादर केले. सान्वीत मुंढे यांनी पेटीवादन केले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तनुजा तिकोणे, जयश्री खाडे व धनंजय तळपे यांनी संयोजन केले.
डी. ई. एस. सेकंडरी शाळेचे दहावी परीक्षेत यश
डी. ई. एस. सेकंडरी शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च २०१८ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. डी.ई.एस. सेकंडरी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. विशेष प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या ११३ तर प्रथम वर्ग मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ आहे.
५६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. परीक्षेला १४५ विद्यार्थी बसले होते. अव्दैत शैलेश जोशी ९९ टक्के (प्रथम), चारूता योगेश खरे ९८.२० टक्के (व्दितीय), अर्चिता प्रशांत रावतेकर ९८ टक्के (तृतीय), वैष्णवी राहुल जोशी ९७ टक्के, अथर्व जितेंद्र चिरजपुटकर ९७.८० टक्के व गितिका राहुल महाजन हिने ९६.८० टक्के मिळविले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता नायडू, उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती बोधे व पर्यवेक्षिका मंजुषा बोरावके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

