Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिळणार विद्यार्थिनींना प्रवेश

Date:

पुणे- राम गणेश गडकरी, केशवसूत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर, राम कोरटकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणार्‍या टिळक रस्त्यावरील ऐतिहासिक न्यू इंग्लिश स्कूलमध्ये या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देऊन सहशिक्षण सुरू करण्याचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.
आजपासून (३ मे) इयत्ता पाचवीच्या वर्गांसाठी विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींना प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत. मुख्याध्यापक नागेश मोने यांनी ही माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरिणांनी एकत्र येऊन राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
त्याकाळी शासकीय संस्था आणि ख्रिश्‍चन मिशिनर्‍यांमधून शिक्षण दिले जात होते. त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही क्रांतीकारी घटना ठरली. किफायतशीर शुल्क आकारुन दर्जेदार राष्ट्रीय शिक्षण सुलभतेने उपलब्ध व्हावे हा स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर २४ ऑक्टोबर १८८४ रोजी स्थापन झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाखाली न्यू इंग्लिश स्कूलचे कामकाज सुरू झाले.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, डॉ. धोंडो केशव कर्वे, डॉ. द. न. गोखले, मो. रा. वाळंबे, पु. ना. विरकर आदी मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. १९५४ मध्ये शाळा टिळक रस्त्यावरील इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली. या वास्तूला पुरातत्व खात्याने हेरिटेज दर्जा दिला आहे.
१९३६ पर्यंत शाळेत विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याच्या नोंदी जुन्या कागदपत्रांमध्ये आढळतात. आता या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहशिक्षण ही काळाची गरज आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास महिलांबद्दलचा आदर वाढण्यासाठी सहशिक्षण आवश्यक आहे. गुणवत्ता, अनुशासन, कार्यक्षमता यांचा विचार करून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.
तारांगण, वेधशाळा, भूगर्भशास्त्र संग्रहालय, सर्जन मंचाद्वारे चित्रकला, शिल्पकला व ओरिगामी प्रशिक्षण, इंग्रजी प्रयोगशाळा, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहंम भारत, समाजसेवा शिबिरे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आदी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात अशी माहिती शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे यांनी दिली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या...

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे...

खराडीतील ‘ए वन स्पा’वर छापा:वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका

पुणे - खराडीत असलेल्या 'ए वन स्पा' सेंटरवर पोलिसांनी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...