पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष विकास काकतकर, वसतिगृह व्यवस्थत्तपन समितीचे अध्यक्ष राम निंबाळकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी, वसतिगृह प्रमुख प्रा. श्रीधर व्हनकटे, प्रा, स्वाती जोगळेकर, डॉ. किशोर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीत महाविद्यालयाच्या वसतिगृह क‘मांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहात होते. या ऐतिहासिक खोलीमध्ये सावरकरांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सावरकर वापर असलेला पलंग, त्यांचे साहित्य, वकीली करत असताना परिधान केलेले गाऊन या खोलीमध्ये जतन करण्यात आला आहे.