पुणे, ता. ४ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘पब्लिक कन्सर्न ङ्गॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘बेटर पोलिसिंग’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उत्तर प्रदेश पोलीस दलाचे निवृत्त महासंचालक प्रकाश सिंग प्रमुख वक्ते होते.
यावेळी बोलताना श्री. सिंग म्हणाले, कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर दहशतवाद, नक्षलवाद, अमली पदार्थांची तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी पोलीसांना काम करावे लागते. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांच्या कामकाजात सुधारणा करण्यात आल्या आहेत. परंतु अपुरे मनुष्यबळ, पोलिसांच्या घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे.
श्री. उमराणीकर म्हणाले, समाजात पोलीस नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे. पोलिसांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी सूचना झाल्या, आयोगाची निर्मिती झाली, प्रत्यक्षात सूचना, सुधारणा कागदावरच राहिल्या. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी स्वागत केले. एस. सी. नागपाल, सत्यबीर दोड, ए. व्ही. कृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘बेटर पोलिसिंग’वर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात परिसंवाद
Date:

