पुणे – मुलगा व मुलगी समान आहे, पाणी जपून वापरा, स्वच्छतेचे महत्व आणि प्लॅस्टिकपासून पर्यावरणाचे रक्षण करा अशा विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणारी २७ सामुदायिक नृत्यांचे सादरीकरण करीत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले.
अभ्यास आणि अभ्यासेतर उपक‘मांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या वर्षीचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सेवक सतीश भुजबळ यांना देण्यात आला. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य दिलीप काळे यांच्या संतूरवादनाने कार्यक‘मात रंगत आणली. सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. शरद आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिका सुषमा गायकवाड, पालक संघाचे उपाध्यक्ष राजू नाणेकर, सहकार्यवाह संतोष उभे, संमेलनाच्या कार्याध्यक्षा स्वाती मिश्रा, उपकार्याध्यक्ष आनंद पाटील, सुवर्णा बोरकर, विद्यार्थी प्रतिनिधी सचिन मिरगुडे, मोहक बर्वे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.
सामाजिक संदेश देत न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन
Date:

