पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत ‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे विसावे वर्ष आहे.
प्रसिध्द अभिनेता राजन भिसे नाटकाच्या ध्वनिप्रकाश योजनेपासून अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत अष्टपैलू कामगिरी करणार्या राजन भिसेे ‘नाट्यावकाश’ हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हर शीतल महाजन हिचे सादरीकरण व मुलाखत ‘ड्रीम टू फॉल’ त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
मंदिरांचे अभ्यासक उदयन इंदूरकर यांचे ‘एक होतं देऊळ’ या कार्यक्रमातून वैज्ञानिकदृष्ट्या मंदिरांचे महत्व ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उलगडणार आहे. संध्याकाळी सहा वाजता अभिनेता अभय महाजन व सिध्दार्थ मेनन यांच्याशी ‘ऑफस्क्रीन गप्पा होणार आहेत.
‘प्रकाशाची अक्षरे’ हा प्रविण दवणे यांची मुलाखत व कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, संध्याकाळी साडेसहा वाजता सपना दातार व त्यांच्या बारा सहकार्यांचा ‘स्वरस्वप्न’ हा व्हायोलियन वादनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक‘म ङ्गर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऍम्फीथिएटरमध्ये होणार असून, सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य व खुला राहणार आहे.