पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत ‘विमान बनवा, विमान उडवा’ हा उपक‘म आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा हा या उपक‘माचा मु‘य उद्देश होता. वैमानिक सदानंद काळे यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सहासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मंडळाचे प्रमुख हेमंत पाठक यांनी संयोजन केले.