पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहाशे शिक्षक आणि ३५० शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा तीन गटांत कार्यशाळांची विभागणी करण्यात आली होती. शिक्षकांच्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण परिषदचे डॉ. गणपत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यापन करताना प्रश्नोत्तर स्वरूपाऐवजी संकल्पनांना प्राधान्य द्यावे, शिक्षकांचा गुणात्तम दर्जा वाढल्यास संस्थेची गुणवत्ता वाढेल असे विचार श्री. माने यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यालयीन कर्मचार्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन ग‘ाहक पेठेचे सुर्यकांत पाठक यांच्या हस्ते आणि शिक्षकेतरांच्या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते महादेव पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संस्थांतील कर्मचारी कळत-नकळत विद्यार्थ्यांवर संस्कार करीत असतात. शैक्षणिक संस्कारांबरोबर परस्पर सुसंवाद आवश्यक असल्याचे मत श्री. पाठक यांनी व्यक्त केले. श्री. पाटोळे यांनी कार्यसंस्कृतीचे महत्व विषद केले.
अध्यापनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, आरोग्य समस्या, शिक्षणातील मानसशास्त्र, प्रभावी संवाद कौशल्ये या विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांसाठी आणि भाषा व सामाजिक शास्त्र विषयांच्या शिक्षकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. पं. विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांना कर्म हीच देवाची पूजा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य हीच संपत्ती, जबाबदारी, कार्यसंस्कृती, वैयक्तिक आर्थिक नियोजन या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. विनय पत्राळे, डॉ. कल्पना खांडेकर, डॉ. सुब्बालक्ष्मी कुमार, नरेश करपे, मंदार लवाटे, डॉ. अविनाश कांदेकर, आरती निमगावकर, अंकुर थुबाना, रुपाली ब‘म्हे, दीपाली महाते, डॉ. विदुला शेंडे, अनिल सावरकर, शितल रूईकर, डॉ. मेघा देवुस्कर, वैदेही देसाई या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती जोगळेकर यांनी सर्व कार्यशाळांचे यशस्वी संयोजन केले.
सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या कल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक व शिक्षकेतरांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याबरोबर त्यांचा व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक दृष्टिकोन, परस्पर सुसंवाद, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे, आर्थिक नियोजन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबी डोळ्यांसमोर ठेवून कार्यशाळेची रचना केली असल्याची माहिती डॉ. कुंटे यांनी दिली.