पुणे – मुलांना लहानपणापासूनच प्रत्यक्ष जीवनातील व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने ,डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्रायमरी स्कूल’मध्ये बाजाराचा दिवस या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, मसाले, भाज्या, ङ्गळे खरेदीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मुळशी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जगन्नाथ मगर, उल्हास बलकवडे यांची नेत्रा वेदपाठक यांनी मुलाखत घेतली. नांगरणी, कुळवणी, पाबर, पेरणी, पाणी देणे, ठिबक सिंचन, पाण्याचा वापर, खतांचा वापर, काढणी, ग्राहकापर्यंत शेती माल पोहोचवणे याविषयीची माहिती मुलाखतीतून मिळाली. कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शेतीची प्रकि‘या माहिती व्हावी, अन्न निर्मितीसाठी लागणारी मेहनत आणि कालावधी माहिती व्हावा, अन्न वाया घालवू नये हा संस्कार रुजावा, खरेदीचा अनुभव मिळावा, व्यवहार ज्ञान वाढावे, आर्थिक व्यवहार व काटकसरीचे महत्व कळावे यासाठी या उपक‘माचे आयोजन केल्याची माहिती मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी दिली. शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा श्वेता मोघे, अभिजीत शिराळकर यांचे संयोजनात सहकार्य लाभले.
——