पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’मध्ये विमानाच्या प्रतिकृती उड्डाणाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. विमानाची अंतर्गत व बाह्य रचना, विमानतळ, धावपट्टी, उड्डाणासाठी झेप, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अभियांत्रिकी विषयांची आवड निर्माण व्हावी यासाठी या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी उपक‘म आयोजित केल्याची माहिती मु‘याध्यापिका माधुरी बर्वे यांनी दिली. अनिरुध्द छत्रे आणि जी. एन. पट्टन यांनी उपक‘माचे संयोजन केले. पालक-शिक्षक संघाचे विशेष सहकार्य लाभले.
विमानाच्या प्रतिकृती उड्डाणाची प्रात्यक्षिके ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’चा उपक‘म
Date: