कठीण वाटणार्‍या गोष्टी ‘ऑपशन’ला टाकू नका- तेजस्वी सातपुते

Date:

बीएमसीसीत गुणवंतांचा गौरव
पुणे- जीवनात कठीण वाटणार्‍या गोष्टी ‘ऑपशन’ला टाकू नका. अशा आवडत नसलेल्या कठीण गोष्टींचा कधी ना कधी सामना करावाच लागतो. त्यामुळे त्यावर मात करीत पुढे शिकत जा. असा सल्ला सातारा जिल्हा पोलीस सुपरिटेंडन्ट तेजस्वी सातपुते यांनी दिला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून सातपुते बोलत होत्या. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, बीबीएच्या समन्वयिका प्रा. भारती उपाध्ये, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा. रविना तांबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. प्रीती राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातपुते पुढे म्हणाल्या, ‘सध्याच्या स्पर्धात्मक युगात आंतरशाखीय अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विशिष्ट क्षेत्रात करिअर करीत असताना, अन्य क्षेत्रांचा अभ्यास तितकाच महत्त्वाचा झाला आहे. आयुष्यभर विद्यार्थी राहात अशाप्रकारचा अभ्यास केला पाहिजे. समाजात गुणात्मक बदल करण्यासाठी स्वतःतील चांगुलपणा वाढवत नेला पाहिजे.’
विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असल्याचे मत डॉ. कुंटे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. डॉ. रावळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. निकिता शर्मा यांनी सूत्रसंचालन, प्रा. स्मृती पटवर्धन यांनी परिचय आणि प्रा. स्वाती महानुर यांनी आभार प्रदर्शन केले.कनिष्ठ महाविद्यालय, बीकॉम, बीबीए, एमकॉम, पीएच. डी. आणि विविध शिष्यवृत्त्या मिळविलेल्या दोनश हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
पुरुषांनी अधिक विचारी व्हावे
महिलांचा रोज सन्मान झाला पाहिजे. महिलांना सबलीकरणाचा उपदेश करत असताना पुरुषांनी अधिक विचारी झाले पाहिजे. असे मत सातपुते यांनी व्यक्त केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...